Indian Constitution Edition  Saam Digital
देश विदेश

Indian Constitution Edition : भारतीय संविधानाच्या पहिल्या दुर्मिळ प्रतिचा लिलाव; तब्बल इतक्या रुपयांची लागली बोली

Indian Constitution Edition : भारतीय संविधाना संविधानाच्या प्रतिला लिलावात ४८ लाख रुपयांची बोली लागली आहे. 'सॅफ्रन आर्ट' या प्राचीन वस्तू, पुस्तकांचे लिलाव करणाऱ्या कंपनीनं ही बोली लावली होती.

Sandeep Gawade

भारतीय संविधानाबद्दल नेहमीच कुतूहल राहिलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नानंतर संविधानाची पहिली प्रत तयार करण्यात आली होती. ही प्रत कलेचा एक अप्रतिम नमुना मानली जाते. या पहिल्या प्रतीचा लिलाव झाला असून आतापर्यंतची सर्वाधिक बोली लागली आहे. संविधानाचीही पहिली प्रत ४८ लाख रुपयांना विकली गेली आहे.

प्राचीन वस्तू आणि पुस्तकांचा लिलाव करणाऱ्या 'सॅफ्रन आर्ट' या कंपनीने ही बोली लावली होती. संविधान पूर्ण झाल्यानंतर डेहराडूनमधील भारतीय सर्वेक्षण कार्यालयाकडून पहिल्या प्रतिच्या १,००० प्रती छापण्यात आल्या होत्या. त्यानंतर १९५० मध्ये सरकारने संविधानाची ही प्रत्र प्रकाशित केली होती. फोटोलिथिग्राफिक प्रत ज्याची ब्ल्यू प्रिंट भारताच्या संसदेतील लायब्ररीमध्ये ठेवण्यात आली आहे. यात संविधान लिहिणाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या देखील आहेत.

संविधनाच्या ब्ल्यू प्रिंटवर १९४६ च्या संविधान सभेत २८४ सदस्यांच्या हातांचे निशान आहेत. यामध्ये लेखिका कमला चौधरी यांची हिंदीतील तर तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या इंग्रजीतील स्वाक्षरीचाही समावेश आहे.

'सॅफ्रन आर्ट' या कंपनीने २४ ते २६ जुलै या तीन दिवसांच्या काळात हा ऑनलाईन लिलाव सुरु केला होता. यात ऐतिहासिक वस्तू, कला, साहित्य आणि प्राचीन वस्तूंचा समावेश होता. सौंदर्यशास्त्राशिवाय प्रत्येक वस्तूला भारताच्या परंपरेचा दस्ताऐवज म्हणून ऐतिहासिक मूल्य असते, असं 'सॅफ्रन आर्ट' कंपनीच्या सहसंस्थापक मीनल वजीरानी यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT