India Pakistan War saam tv
देश विदेश

India Pakistan War: मध्यरात्री भारताने पाहा कसे पाडले पाकिस्तानचे ड्रोन? इंडियन आर्मीने शेअर केला पहिला VIDEO

Indian Army Releases Video Of Drone Shot: इंडियन आर्मीने एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये भारतीय सैन्याने हवेतच ड्रोन कसा पाडला हे दाखवण्यात आलं आहे. भारतीय सैन्याने सर्व ड्रोन हल्ले उधळून लावले आणि पाकिस्तानच्या गोळीबाराला योग्य प्रत्युत्तर दिलंय.

Surabhi Jayashree Jagdish

Indian Army Releases Video Of Drone Shot: भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव वाढला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतीय सीमाभागातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी भारतीय सेनेने त्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय. पाकिस्तानच्या या कृत्यानंतर भारताने पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं आहे. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, भारताने पाकड्यांच्या १५ मोठ्या शहरांवर हल्ला चढवला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ

दरम्यान भारतीय लष्कराने एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय सेनेने दहशतवाद्यांचा विध्वंस कसा केला हे दाखवलं आहे. आर्मीने हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलंय की, "८ आणि ९ मे च्या रात्री पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रसामग्रीचा वापर करून अनेक हल्ले केले. यासोबतच, जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LoC) सतत युद्धबंदीचे उल्लंघन (CFVs) करण्यात आलं. यावेळी ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवून लावण्यात आले आणि सीएफव्हींना योग्य प्रत्युत्तर देण्यात आले"

#IndianArmy देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचx रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. सर्व नापाक कटांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल, असंही या पोस्टमध्ये म्हटलंय.

गुरुवारी रात्री भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे जळफळाट झालेल्या पाकिस्तानी सैन्याने भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातील अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारताने देखील हल्ला केला आहे. यावेळी भारताने एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीच्या माध्यमातून हे हल्ले अयशस्वी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT