Indian soldier x
देश विदेश

सीमेवर पाकिस्तानशी लढायला चालला होता, पण...; जवानाच्या पत्नीचाही मृत्यू, ३ वर्षांची लेकही जखमी

India Pakistan Tension वाढल्याने सुरक्षा मंत्रालयाने सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द केल्या. सुट्टीवर असलेले मेजर विक्रम गुप्ता ड्युटीवर जाण्यासाठी निघाले होते. पण रस्त्यातच त्यांच्या कारचा अपघात झाला.

Yash Shirke

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणल्याने सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. सैनिकांसह लष्करातील अधिकाऱ्यांना ड्युटीवर बोलवण्यात आले. कामावर येण्याचे आदेश मिळाल्याने मेजर विक्रम गुप्ता घरातून निघाले. रस्त्यातच त्यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातामध्ये विक्रम गुप्ता यांची पत्नी वैशाली यांचा मृत्यू झाला, तर तीन वर्षांची मुलगी रिहाना गंभीररित्या जखमी झाले.

हेड कॉन्स्टेबल फकरुद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-मुंबई महामार्गावरुन ड्युटीवर परतत असताना विक्रम गुप्ता यांच्या कारचा टायर फुटल्याने अपघात झाला. त्यांच्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाला. तर ३ वर्षांची रिहाना जखमी झाली. मेजर विक्रम गुप्ता हे दिल्लीतील दिलशाद गार्डनजवळ राहतात. सुट्टी असल्याने ते पत्नी आणि लेकीसह नातेवाईकांना भेटण्यासाठी कोटा येथे गेले होते.

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याने मेजर विक्रम गुप्ता यांचीही सुट्टी रद्द झाली. ते पत्नी आणि लेकीसह दिल्लीला परतत होते. दोघींना घरी सोडून ते ड्युटीवर जाणार होते. दिल्ली मुंबई महामार्गावरील नौगंवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कल्व्हर्ट क्रमांक ८२ जवळ त्यांच्या कारचा टायर अचानक फुटला. कार नियंत्रणाबाहेर गेली आणि अपघात झाला.

कारचा गेट उघडताच वैशाली आणि रिहाना रस्त्यावर पडल्या. त्या दोघीही जखमी झाल्या होत्या. रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांनी त्यांना तात्काळ अलवर रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी वैशाली यांना मृत घोषित केले. जखमी रिहानावर त्यांनी उपचार करायला सुरुवात केली, तिची प्रकृती अजूनही गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT