Indian Army helicopter crashed Latest News SAAM TV
देश विदेश

Indian Army helicopter crashed : भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; घटनास्थळावरचा VIDEO पाहा

अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग जिल्ह्यात मिगिंग येथे शुक्रवारी सकाळी भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळलं.

Nandkumar Joshi

Indian Army helicopter crashed Latest News : अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग जिल्ह्यात मिगिंग येथे शुक्रवारी सकाळी भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळलं. अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर लष्कराच्या जवानांना घेऊन जात होते.

ही घटना आज सकाळी जवळपास पावणेअकराच्या सुमारास घडली. शोधकार्य आणि बचावमोहीम हाती घेण्यात आली आहे.

अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात शुक्रवारी लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. लष्कराचे हे अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर होते. लष्कराच्या जवानांना घेऊन ते नियमितपणे जात होते. सकाळी साधारण १० वाजून ४३ मिनिटांनी हेलिकॉप्टर (Helicopter) दुर्घटनाग्रस्त झाले.

या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन पायलटचा समावेश आहे. एचएएल रुद्रा या अॅडव्हास लाइट हेलिकॉप्टरमधून ते प्रवास करत होते. ज्या ठिकाणी दुर्घटना घडली, ते ठीकाण कोणत्याही रस्त्याशी जोडलेले नाही. (Latest Marathi News)

या घटनेनंतर बचाव पथकाला घटनास्थळी रवाना करण्यात आले. सकाळी झालेल्या दुर्घटनेतील पाचही जणांचे मृतदेह सापडले आहेत. भारतीय लष्कराकडून मृतांच्या नातेवाइकांना आधी माहिती दिली जाईल. त्यानंतर मृतदेहांची ओळख उघड करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची भावनेला हात घालणारी प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT