Ajit Doval on Subhash Chandra Bose Saam Tv
देश विदेश

Ajit Doval on Subhash Chandra Bose: नेताजी सुभाषचंद्र बोस हयात असते तर भारताची फाळणी झाली नसती: अजित डोवाल

नेताजी सुभाषचंद्र बोस हयात असते तर भारताची फाळणी झाली नसती: अजित डोवाल

Satish Kengar

Ajit Doval on Subhash Chandra Bose: ''नेताजी सुभाषचंद्र बोस हयात असते तर भारताची फाळणी झाली नसती'', असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हणाले आहेत. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाने (ASSOCHAM) दिल्लीत आयोजित केलेल्या पहिल्या नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती व्याख्यानमालेत ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, नेताजींनी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर धैर्य दाखवले आणि गांधींना आव्हान देण्याचे धाडस दाखवले. पण गांधी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शिखरावर होते.

डोवाल पुढे म्हणाले, बोस यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर त्यांनी नव्याने संघर्ष सुरू केला. ते म्हणाले, मी चांगले किंवा वाईट म्हणत नाही. परंतु भारतीय इतिहासात आणि जागतिक इतिहासात असे फार कमी लोक आहेत, ज्यांच्यात प्रवाहाच्या विरोधात जाण्याचे धाडस होते. ते म्हणाले की, नेताजी एकच असे व्यक्ती होते, त्यांना जपानशिवाय कोणत्याही दुसऱ्या देशाने पाठिंबा दिला नाही. (Latest Marathi News)

'जिना यांनाही बोस यांचं नेतृत्व मान्य होतं'

अजित डोवाल म्हणाले की, मी इंग्रजांशी लढेन, स्वातंत्र्याची भीक मागणार नाही. असा विचार त्यांच्या मनात आला. सुभाष बोस हयात असते तर भारताची फाळणी झाली नसती. जिना म्हणाले होते की, मी फक्त एक नेता स्वीकारू शकतो आणि तो म्हणजे सुभाष बोस.

ते म्हणाले की, एक प्रश्न अनेकदा मनात येतो की जीवनात आपले प्रयत्न किंवा परिणाम महत्त्वाचे असतात. सुभाषचंद्र बोस यांनी केलेल्या महान प्रयत्नांवर कोणीही शंका घेऊ शकत नाही, गांधीही त्यांचे प्रशंसक होते. परंतु लोक सहसा तुमच्या कामाच्या परिणामांवरून तुमच्याकडे पाहतात. मग सुभाष बोस यांचे प्रयत्न व्यर्थ गेले का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Swapna Shastra: स्वप्नात मेलेली व्यक्ती दिसली तर काय संकेत मिळतात?

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता शून्य होणार; नवीन सॅलरी स्ट्रक्चर कधी येणार?

Raj Thackeray: काम करायचं नसेल तर पदं सोडा, राज ठाकरेंनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल|VIDEO

Police Viral Video : पोलीस दारू पिऊन २० रुपये हप्ता घ्यायचा, डोंबिवलीतील हवालदाराचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT