Heavy Rain in 20 States Weather Update  AI Image
देश विदेश

Weather Update : पाऊस धुमाकूळ घालणार! २० राज्यांना सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्रात कसं असेल आज हवामान? वाचा

Weather Update Today News : भारतीय हवामान विभागाने देशातील २० राज्यांना पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा अलर्ट दिला आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • देशातील २० राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता

  • उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीसह अनेक भागांत पाऊस

  • काही भागांत ताशी ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता

  • महाराष्ट्रात उष्ण व दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज

नैऋत्य मौसमी वाऱ्यांनी देशाकडे पाठ फिरवली असली तरी पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. बंगालच्या उपसागरात घोंगावणाऱ्या चक्रीवादळामुळे वातावरणात बदल जाणवत आहे. या चक्रीवादळाचा फटका देशातील राज्यांना बसला आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज २० राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांमध्ये ताशी ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढू शकते.

हवामानाच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, उत्तराखंड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि सिक्कीम या भागांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो.

अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा सर्वाधिक फटका शेतीला बसण्याची शक्यता असते. शेतात उभी असलेली पिकं, काढणीला आलेली पिकं आणि काढणीनंतर शेतात ठेवलेलं धान्य यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी.

देशातील २० राज्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला असला तरी महाराष्ट्रात मात्र उकाडा कायम असणार आहे. आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:कोजागरी पौर्णिमा निमित्त पुणे शहरातील उद्याने आज रात्री १२ पर्यंत सुरू राहणार

Health Care : रात्रीचे जेवण आणि झोपण्यामध्ये किती अंतर असावे?

Sunday Horoscope : कामात नवी संधी मिळेल! ५ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Sunday Horoscope: पैसा आणि नवी संधी, 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट, वाचा रविवारच राशिभविष्य

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT