India Vs Pakistan Rafale Saam Tv
देश विदेश

India Vs Pakistan Rafale: राफेलवर लिंबू मिरची, काँग्रेसकडून खिल्ली; भाजपच्या जिव्हारी

India Vs Pakistan Rafale Attack: पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश संतप्त आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर आता आता राफेलवरुन काँग्रेस अन् भाजपमध्ये वाद सुरु झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश जात, धर्म, पंथ, प्रांत सोडून एकत्र आलाय...मात्र राजकीय पक्षांचा राफेलवरुन आखाडा रंगलाय.. काँग्रेसनं नेमकं काय म्हटलंय? आणि भाजपनं त्यावर काय उत्तर दिलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

राफेलवर लिंबू मिरची, काँग्रेसकडून खिल्ली

आपल्या आवाजानं पाकिस्तान्यांना धडकी भरवणाऱ्या राफेलवरुन देशात पुन्हा वाद पेटलाय.. काँग्रेसनं राफेलचं खेळणं दाखवत लिंबू मिरचीचा मुद्दा छेडलाय. तर त्याला भाजपनंही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे.. दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची मागणी केली जातेय... मात्र सरकारने पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करण्याचाच प्रयत्न केलाय..तर सरकार राफेल पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी असल्याचा दावा करत आहे.. याच राफेलवरुन काँग्रेसने सातत्याने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय.. आताही पुन्हा काँग्रेसनं राफेल लिंबू मिरची बांधण्यासाठी आहे का? त्याचा वापर कधी करणार? असा प्रश्न उपस्थित केलाय . मात्र हे राफेल खरेदीपासूनच वादात सापडलंय.ते नेमकं कसं? पाहूयात...

36 राफेल खरेदीत गैरव्यवहाराचा काँग्रेसचा आरोप

2019

राफेल भारतात दाखल झाल्यानंतर त्याला लिंबू मिरची बांधण्यात आली.

2020

526 कोटींचं राफेल 1670 कोटींना खरेदी केल्याचा आरोप केला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने राफेलच्या युद्धसरावास सुरुवात केलीय.. एवढंच नाही तर हवाई दल, नौदल आणि लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश दिलेत.. दुसरीकडे विरोधी पक्षांनीही पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सरकारला पाठींबा दिलाय.मात्र पाकिस्तानविरोधात संपूर्ण देश एकदिलानं उभा असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्यात मग्न आहेत, हे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया आता उमटत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनावर फेकले कांदे; नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा संताप उसळला|VIDEO

CM Fadnavis: वाद निर्माण झाला तर विचार करावा लागेल; पोस्ट कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंसह मंत्र्यांना झापलं

Dengue In Monsoon: पावसाळ्यात डेंग्यूपासून कसा कराल बचाव? फॉलो करा 'या' टिप्स

Saam Impact : बिअरबारमध्ये सरकारी काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन! मुख्यमंत्र्यांचे आदेश; साम टीव्हीचा दणका

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडच्या १००० कोटीची प्रॉपर्टी जप्त करा; रोहित पवारांची मागणी

SCROLL FOR NEXT