America Crypto Deal With Pakistan 
देश विदेश

India Pakistan Tension: अमेरिकेचा भारताला धोका; बेभरवशाच्या अमेरिकेची पाकिस्तानसोबत डील?

America Crypto Deal With Pakistan: पहलगाम हल्ल्यानंतर भारतासोबत मैत्रीचं नाटक कऱणाऱ्या अमेरिकेचा सौदेबाज चेहरा समोर आलाय. अमेरिकेने ऐनवेळी कशी पलटी मारलीय?पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव वाढलाय. तर संपूर्ण जग पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध करत आहे. मात्र भारतासोबत मैत्रीचं नाटक कऱणाऱ्या अमेरिकेने पुन्हा एकदा आपला बेभरवशीपणा दाखवून देत पलटी मारलीय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्ल्ड लिबर्टी फायनेन्शियल कंपनीने पाकिस्तानसोबत क्रिप्टो करार केल्याचं समोर आलंय.

दगाबाज अमेरिका

वर्ल्ड लिबर्टी फायनेन्शियल कंपनीचा पाक सरकारसोबत क्रिप्टो करार

या कंपनीत ट्रम्पचे 60 टक्के समभाग

पहलगामची जखम ताजी असतानाच इस्लामाबादमध्ये डील

कंपनीच्या सीईओची पाक पंतप्रधान शरीफ आणि लष्करप्रमुख मुनीरसोबत चर्चा

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारताच्या आत्म्यावरच हल्ला केलाय. त्यामुळे भारतात संतापाची लाट उसळलीय.. तर चीन छुप्या पद्धतीने पाकिस्तानला पाठीशी असला तरी रशियाने उघडपणे भारताला पाठींबा दिलाय. या दहशतवादाविरोधातील लढाईत सगळं जग भारतासोबत उभा असताना अमेरिका मात्र सौदेबाजी करताना दिसून येतोय.

नाठाळ अमेरिकेची डबल ढोलकी

1971

भारताविरोधात पाकच्या मदतीला अमेरिकेची युद्धनौका

1999

तटस्थतेचा आव, मात्र मागच्या दाराने पाकला शस्त्रपुरवठा

2001

9/11 हल्ल्यानंतर अमेरिकेची पाकला लष्करी मदत

2024

इस्त्राईल-पॅलेस्टाईन युद्धात संदिग्ध भूमिका

2025

रशियाविरोधात युक्रेनला पाठिंब्याचं आश्वासन, युद्ध सुरु होताच माघार

भारत अमेरिकेला मित्र मानत असला तरी अमेरिका मात्र भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या बेभरवशाच्या अमेरिकेवर विश्वास न ठेवता भारतानं इतरही राजनैतिक पर्यायांचा वापर करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT