Narendra Modi News Saam tv
देश विदेश

Narendra Modi News: '140 कोटी भारतीय ..';PM मोदींकडून विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा

Vishal Gangurde

Narendra Modi News:

क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज ऑस्ट्रेलिया आणि भारताची लढत होत आहे. सामना पाहण्यासाठी लाखो चाहते नरेंद्र मोदी स्टेडियम येथे पोहोचले आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कोण जिंकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारतीय संघावर लाखो लोकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारतीय संघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स' या सोशल मीडियावर पोस्ट करत टीम इंडियाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 'टीम इंडियाला शुभेच्छा. १४० कोटी भारतीय जय-जयकार करत आहे. तुमची चमक दाखवा. चांगले खेळा. खेळाची भावना कायम ठेवा, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी सांयकाळी स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी येणार आहे. अहमदाबाद पोलीस आयुक्त ज्ञानेंद्र सिंह मलिक म्हणाले, 'आज विश्वचषकात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना सुरु आहे. या भागात वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे. शहरातील सुरक्षा व्यवस्थाही सुरळीत आहे. शहरात गर्दी असल्यामुळे वाहतूक मंदावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी सामना पाहण्यासाठी येणार आहे. त्यांच्या आगमनासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे'.

राहुल गांधींकडून भारतीय संघाला शुभेच्छा

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनीही विश्चचषकातील अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. 'विश्वचषकातील अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाला शुभेच्छा. निर्भयपणे खेळा. एक अब्जहून अधिक लोकांचे हृदय धडकत आहे. टीम इंडिया जिंकणार, अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे.

तत्पूर्वी, जगभरातील भारतीयांच्या नजरा आज अहमदाबादमध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे लागल्या आहेत. या सामन्यात टीम इंडियाला २००३ सालचा बदला घेण्याची संधी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार!

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT