China encroachment maxar
देश विदेश

China : चीनच्या अतिक्रमणाने वाढलं भारताचं टेन्शन; भूतान राजघराण्याच्या वडिलोपार्जित क्षेत्रांवर चीनचा ताबा

China encroachment : चीनच्या या विस्तारवादी धोरणामुळे भारताचं टेन्शन वाढणार आहे. चीन ज्याप्रकारे बांधकाम करत आहे. त्यातून स्पष्ट होतं की, त्या ठिकाणी हजारो लोकांच्या वास्तव्याची सोय होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार २०० पेक्षा जास्त एक मजली आणि बहुमजली इमारती त्या ठिकाणी दिसत आहेत. काही ठिकाणी बांधकाम पूर्ण झालेले नाही यामुळे तेथील इमारतींची संख्या जास्त असू शकते.

Bharat Jadhav

China encroachment In Bhutan:

जगभरातील देश चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे चिंतेत आहे. सध्या चीनची नजर भूतानवर असून भूतानमधील भूभागावर चीनने अतिक्रमण केलं आहे.अतिक्रमण केलेल्या भूभागाचे फोटो सॅटेलाईटद्वारे घेण्यात आले आहेत. या छायाचित्रानुसार चीनने बेयुल खेनपाजोंगमधील एका नदीच्या किनाऱ्यावर एक टाऊनशीप निर्माण केली आहे. विशेष म्हणजे सध्या दोन्ही देशात आंतरराष्ट्रीय सीमेविषयी चर्चा होत आहे. त्याचवेळी ही टाऊनशीप उभारली जात आहे. (Latest News)

चीन या भागावर आपला दावा करणार असल्याचं संकेत यातून दिलेत.दरम्यान या चीनच्या या विस्तारवादी धोरणामुळे भारताचं टेन्शन वाढणार आहे.परराष्ट्र धोरणाचे जाणकार असलेले डॉ. ब्रह्मा चेलानी म्हणाले की,भूतानी क्षेत्रीय सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्यासह चिनी बांधकामामुळे भूतान-भारत संबंध कमकुवत करणं. तसेच भूतानला चीनच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडणं असा चीनचा डाव आहे, याविषयीचे वृत्त एनडीटीव्हीने दिलंय. दरम्यान चीनने ताबा केलेला भूभाग हा भूतानमधील वडिलोपार्जित जमीन आहे तरीही येथील सरकार चीनचे अतिक्रमण रोखण्यास असमर्थ ठरले आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कमकुवत शेजारी देशांच्या सांस्कृतिक महत्त्व असलेल्या क्षेत्रावर चीन बेकायदेशीरपणे अतिक्रमण करत आहे, असं मत लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज (SOAS)येथील तिबेटी इतिहासाचे तज्ज्ञ प्रोफेसर रॉबर्ट बार्नेट म्हणाले.बेयुल खेनपाजोंगमधील चीनच्या अतिक्रमणाविषयी भारतातील भूतानचे राजदूतांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. दोन्ही देशात सीमेवरून चर्चा सूरू आहे, आम्ही त्याविषयी माध्यामांशी कोणती माहिती देत नाहीत. परंतु आम्ही आमच्या सीमा दरम्यान भूतान आपल्या क्षेत्रीय हित अबाधित ठेवलं जाईल आणि त्याचे संरक्षण करेल, असं राजदूत मेजर जनरल वेत्सोप नामग्यल याविषयी म्हणाले.

china bhutan

सॅटेलाईटच्या फोटोनुसार,चीन ज्याप्रकारे बांधकाम करत आहे. त्यातून स्पष्ट होतं की, त्या ठिकाणी हजारो लोकांच्या वास्तव्याची सोय होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार २०० पेक्षा जास्त एक मजली आणि बहुमजली इमारती त्या ठिकाणी दिसत आहेत. काही ठिकाणी बांधकाम पूर्ण झालेले नाही यामुळे तेथील इमारतींची संख्या जास्त असू शकते, असं सॅटेलाईट इमेजचे जाणकार म्हणाले. आपण संदर्भासाठी एक इमेज पाहू जी इमेज ही २०२० वर्षी घेण्यात आलीय. या फोटोत आपण पाहू शकतो की यात कोणत्याच प्रकारचे बांधकाम झालेले दिसत नाहीये. दुसऱ्या इमेजमध्ये आपण पाहिलं तर नोव्हेंबर २०२० पासून त्यापर्यंत बेयुल खेनपाजोंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बांधकाम झालं आहे.

भारताची चिंता का वाढली

दरम्यान चथम हाऊसने प्रकाशित केलेल्या लेखात एक अग्रगण्य भू- संशोधक जॉन पोलॉक आणि डेमियन सायमन यांनी बेयुल आणि इतर खोऱ्यांचे महत्त्व सांगितलंय. भूतानच्या काही भागांवर चीनने ताबा घेतल्याने भारताच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. २०१७ मध्ये सिक्कीमला लागून असलेल्या डोकलाम पठारावर भारतीय आणि चिनी सैनिक आमनेसामने आले होते.

चिनी सैनिक त्या भागात रस्त्याचे निर्माण करत होते. त्याला भारतीय सैनिकांनी विरोध करत रस्त्याचे काम रोखलं होतं. डोकलामचा भाग आंतरराष्ट्रीय स्तरावर भूतानचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. डोकलामच्या वादानंतर चीनने अनेकवेळा चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलाय. अमू चू नदीच्या खोऱ्यात तीन गावे बांधण्यासाठी चिनी कामगारांनी भूतानच्या हद्दीत घुसखोरी केली होती. हे पूर्व भागाला असून ते थेट डोकलामला लागून आहे. चीनने भूतानमधील जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणे हा भारताच्या सिलीगुडी कॉरिडॉरसाठी धोका ठरू शकतो. विशेष म्हणजे भारत सिलीगुडी कॉरिडॉरद्वारे ईशान्य भारतातील राज्यांशी जोडला गेलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT