pahalgam Saam
देश विदेश

Pahalgam: काश्मीरमधील दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त; पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर ऑन ॲक्शन मोड

Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची एकूण पाच घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.

Bhagyashree Kamble

पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भारतानेही पाकिस्तानविरोधात आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत दहशतवाद्यांची एकूण पाच घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. आधी दोन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली होती, तर आता आणखी तीन दहशतवाद्यांची घरे उध्वस्त करण्यात आली आहेत.

दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काही करारांना स्थगिती देण्यासह दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त केले आहेत. लष्कर ए तोएबा या संघटनेत सक्रिय असलेल्या शाहिद अहमद कु्ट्टी याचे घर आयआयटी ब्लास्ट लावून उद्धवस्त केलं आहे. शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास तपास यंत्रणेचे अधिकारी यांनी शाहिद अहमद कु्टे याच्या घरी जाऊन कुटुंबाला ताब्यात घेतलं. नंतर रात्री १ वाजेच्या सुमारास दहशतवाद्याच्या घरी ब्लास्ट करून घर उद्धवस्त केलं.

यासह पुलवामा भागातील एहसान उल हक शेख या दहशतवाद्याचं घर, कुलगाममधील झकीर अहमद गानियाचं घर, शोपियाँमध्ये शाहीद अहमद कुटे या दहशतवाद्याचं घर ब्लास्ट घडवून आणून जमीनदोस्त केलं. दरम्यान, शुक्रवारी दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरी याचंही घर पाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पहलगाममध्ये सर्च ऑपरेशन सुरू

पहलगाममधील बैसरन घाटात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराचे जवान अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बांदिपोरा भागात कुलनार येथे चकमकीत १ दहशतवादीची हत्या झाल्याची माहिती आहे. तर, २ सैनिक जखमी झालेत. दरम्यान अजूनही शोधमोहिम सुरू आहे. काश्मीरच्या शोपियाँ आणि पहलगाममधील दहशतवादी घरांची झडती सुरू असून, शेकडो संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील कलाकरांना मारहाण

Farmer Loan waiver : महाराष्ट्रातील ७० हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ५०० कोटी रुपये मिळणार

एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार; २ पॉवरफुल नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री होणार, राजकीय समीकरण बदलणार

Kundali Matching Tips For Marriage: लग्नासाठी मुला- मुलीचे किती गुण जुळले पाहिजेत?

Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

SCROLL FOR NEXT