ISRO, Space Station, Moon Mission Saam Digital
देश विदेश

ISRO, Space Station, Moon Mission: २०३५ पर्यंत अंतराळ स्टेशन...२०४० मध्ये चंद्रावर जाणार पहिला भारतीय, पंतप्रधान नरेंद्र मोदी

PMO, PM Narendra Modi: भारताच्या गगनयान मोहिमेचा आढावा आणि भविष्यातील मोहिमांची रूपरेषा ठरविण्यासासंदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गगनयान मोहिमेच्या संशोधकांसोबत उच्चस्तरीय बैठक पार पडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ISRO, Space Station, Moon Mission

भारत २०३५ पर्यंत अंतराळ स्टेशन उभारेल आणि २०४० मध्ये चंद्रावर पहिला भारतीय पाठवला जाणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळ संशोधकांना दिले. भारताच्या गगनयान मोहिमेचा आढावा आणि भविष्यातील मोहिमांची रूपरेषा ठरविण्यासासंदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गगनयान मोहिमेच्या संशोधकांसोबत उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी संशोधकांना कामाला लागण्याचे आदेश दिले. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) यासंदर्भात माहिती दिली आहे.

आदित्य एल १ आणि चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आता गगनयान मोहिमेची तयारी करत आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेची महत्त्वाची चाचणी या महिन्यात केली जाणार असून या मोहिमेमुळे अंतराळातील अनेक रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. भारताचे संशोधक पहिल्यांदाच अंतराळात जाणार असल्यामुळे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलं आहे.

दरम्यान आज झालेल्या बैठकीत, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी गगनयानच्या क्रू मॉड्युल सिस्टिम, टिव्ही -डी १ ची पहिली चाचणी, त्यानंतर टिव्ही -डी २, टिव्ही -डी ३ आणि टिव्ही -डी ४ या सर्व चाचण्यांची सविस्तर माहिती नरेंद्र मोदीं यांना दिली. यावेळी मोदी यांनी, २०३५ पर्यंत भारताचे अंतराळ स्टेशन उभा करायचे आहे आणि त्यांनतर २०४० पर्यंत भारतीय अंतराळ संशोधक चंद्रावर पाऊल ठेवतील या उद्देशाने काम करण्याच्या सूचना शास्त्रज्ञांना केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकींसाठी ४१० कोटी मंजूर; ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार? eKYC बाबत घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

High Speed Rail : १९ तासांचा प्रवास फक्त २ तासात, हाय-स्पीड ट्रेनचा मास्टरप्लान नेमका काय?

Chirote Recipe : दिवाळीत बनवा मऊसूत- खुसखुशीत चिरोटे, एक घास खाताच गावाची आठवण येईल

Sonakshi Sinha : कतरिनानंतर सोनाक्षी सिन्हा देणार गुडन्यूज? 'तो' VIDEO पाहून सोशल मीडियावर रंगली प्रेग्नेंसीची चर्चा

SCROLL FOR NEXT