Haj Agreement 2024 Saam Tv
देश विदेश

Haj Agreement 2024: भारताने सौदी अरेबियासोबत केला हज करार, नेमका काय आहे हा करार? जाणून घ्या

Saudi Arabia News: स्मृती इराणी यांच्यासमवेत परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी, सौदी अरेबियाचे हज आणि उमराह मंत्री, डॉ. तौफिक बिन फवजान अल-रबिया यांच्या सह, सौदी अरेबियात जेद्दाह इथे द्विपक्षीय हज करार 2024 वर स्वाक्षरी केली.

साम टिव्ही ब्युरो

Haj Agreement 2024:

भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील हज करार 2024 वर स्वाक्षरी करण्यासाठी आणि हज परिषदेला उपस्थित राहण्यासाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी रविवारी जेद्दाह येथे दोन दिवसीय दौऱ्यावर गेल्या आहेत. जेद्दाह विमानतळावर भारतीय राजदूत डॉ. सुहेल खान, कौन्सुल जनरल मोहम्मद शाहिद आणि सौदी हज आणि उमराह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मंत्री इराणी यांचं स्वागत केले.

यावेळी स्मृती इराणी यांच्यासमवेत परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी, सौदी अरेबियाचे हज आणि उमराह मंत्री, डॉ. तौफिक बिन फवजान अल-रबिया यांच्या सह, सौदी अरेबियात जेद्दाह इथे द्विपक्षीय हज करार 2024 वर स्वाक्षरी केली. हज 2024 साठी भारतातून एकूण 1,75,025 यात्रेकरूंचा कोटा निश्चित करण्यात आला असून भारतीय हज समितीच्या माध्यमातून जाण्यासाठी यात्रेकरूंच्या 1,40,020 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यामुळे 2024 वर्षात हज यात्रेला पहिल्यांदाच जाणार असलेल्या सर्वसाधारण यात्रेकरूंना मोठा फायदा होईल, तर 35,005 यात्रेकरूंना हज समुहाच्या परिचालकांद्वारे हजयात्रा करण्याची परवानगी दिली जाईल.   (Latest Marathi News)

लेडीज विदाऊट मेहरम (LWM) श्रेणी अंतर्गत सहभागास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने भारत सरकारने राबवलेल्या उपक्रमाची यावेळी चर्चा झाली, तसेच या उपक्रमाचे कौतुकही करण्यात आले.

द्विपक्षीय हज करारावर स्वाक्षरी केल्यानंतर आणि सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर, स्मृती इराणी यांच्यासोबत मुरलीधरन यांनी, जेद्दाहच्या किंग अब्दुल अझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हज टर्मिनलला भेट दिली. हज यात्रेकरूंच्या व्यवस्थेची देखरेख करण्यासाठी आणि भारतीय हज यात्रेकरुंच्या सोयीसाठी उत्तम मालवाहतूक तसेच देखरेख यंत्रणा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ही भेट होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT