India vs Pakistan saam tv
देश विदेश

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

India-Pakistan Tensions Rise: मध्य-पूर्वेतील युद्धानं होरपळलेल्या पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी काही कमी होत नाहीये. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी थेट भारतावर हल्ला करण्याची भाषा केलीये. पाहूयात यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऑपरेशन सिंदूरमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतरही पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी काही उतरत नाहीये. अशातच आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला पोकळ धमकी दिलीये. कोलकाता शहरावर हल्ला करण्याची वल्गना संरक्षणमंत्र्यांनी केलीये. यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे आहेत.

आधीच मध्य-पूर्वेतील युद्धामुळं हातात कटोरा घेण्याची वेळ आलेली असतानाही पाकिस्तानचा युद्धज्वर काही कमी होताना दिसत नाहीये. देशांतर्गत अस्थिरतेमुळे पिचलेल्या आपल्या नागरिकांना शांत करण्यासाठी पाकिस्तान नेहमीच भारताला पोकळ धमक्या देत असतं. त्यामुळे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारत फॉल्स फ्लॅग ऑपरेशनची तयारी करत असल्याचा कांगावा केलाय. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणं फॉल्स फ्लॅग ऑपरेशन नेमकं काय आहे.. पाहूयात.

‘फॉल्स फ्लॅग ऑपरेशन’म्हणजे एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला दोषी ठरवण्यासाठी मुद्दाम बनावट लष्करी कारवाया करण्याची पद्धत. जेव्हा एखाद्या देशाला दुसऱ्या देशावर आक्रमण करायचे असते, तेव्हा जगाचा पाठिंबा मिळवण्यासाठी अशा 'फॉल्स फ्लॅग' ऑपरेशनचा आधार घेतात. दरम्यान पाकिस्तानच्या पोकळ धमक्यांना भारतीय संरक्षण मंत्र्यांनी आधीच चोख प्रत्युत्तर दिलयं. त्यामुळे यावेळी पाकिस्ताननं दहशतवादी कारवाई केल्यास भारत पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्याशिवाय शांत बसणार नाही.

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांना भारतानं वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे भारतानं दिलेल्या या इशाऱ्यानंतर पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली. आणि पोकळ धमक्यानी पाकिस्तान भारतावर गुरगुरतोय. मात्र यावेळी पाकिस्ताननं दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न केला तर भारत त्याला सडेतोड उत्तर देईल. आणि आम्ही छेडत नाही, पण कुणी छेडलं तर त्याला सोडत नाही, हे भारताचं नवे धोरण पाकिस्तानला उद्धवस्त करेल. एवढं निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

IPL 2026: पराभवाच्या धक्क्यानंतर मुंबई इंडिन्यसला मिळाली आनंदाची बातमी; अष्टपैलू खेळाडूची संघात वापसी

Crime: अशोक खरातनंतर आणखी एका भोंदूचा कारनामा, फार्म हाऊसवर बोलावलं, भूतप्रेत उतरवतो सांगून महिलेवर बलात्कार

Maharashtra Live News Update: हार्बर मार्गावरील नेरूळ जुईनगर स्थानक दरम्यान तांत्रिक बिघाड, लोकल सेवा विस्कळीत

अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; पत्रात गर्भलिंगनिदान प्रकरणात रुपाली चाकणककरांचे नाव, खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT