Covid-19 Saam Tv
देश विदेश

New wave of Covid-19 : भारतात कोरोनाचा लाट येणार? ११ राज्यात पुन्हा डोकं वर काढलं, महाराष्ट्राने चिंता वाढवली

Corona Virus Cases in Maharashtra and Kerala: भारताच्या ११ राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. नवीन जेएन.१ प्रकारामुळे चिंता वाढली आहे.

Namdeo Kumbhar

New wave of Covid-19 in India, Kerala has most cases : पावसाळा सुरू होताच सर्वांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण देशात आता कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील ११ राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. देशात आतापर्यंत २५७ बाधित रूग्ण असल्याचे आढळले आहेत. केरळ आणि महाराष्ट्राने देशाची चिंता वाढवली आहे, कारण या दोन राज्यात सर्वाधिक बाधित रूग्णांचा समावेश आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या १०३ वर पोहोचलीय. यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. चिंतेची बाब म्हणजे 4 महिन्यांच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली. महाराष्ट्राशिवाय केरळमध्येही कोरोनाचा फैलाव वाढला आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे देशाची चिंता वाढली आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगनंतर आता भारतामध्येही कोरोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका मुंबईला असल्याचे आकड्यावरून दिसतेय. महाराष्ट्रातील एकूण रूग्णांपैकी ८० टक्के रूग्ण मुंबईमधील आहेत. मुंबईमध्ये चार महिन्याच्या चिमुकलीलाही करोनो झाला आहे, त्यामुळे लोकांमध्ये अधिक भीतीचे वातावऱण आहे.

हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंडसारख्या आशियाई देशांमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. त्यामुळे या देशांमध्ये कोरोनाची लाट आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतातही रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. जेएन १ आणि त्याचे उपप्रकार एलएफ ७ आणि एनबी.१.१८ या विषाणूमुळे कोरोनाच्या रूग्णांमध्ये ही वाढ होत आहे. सध्या देशात २५७ सक्रिय रुग्ण आहेत. अधिकाऱ्यांनुसार, बहुतांश प्रकरणे सौम्य आहेत. रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. केरळमध्ये ६९ रुग्ण आहेत. महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्येही कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे.

काय काळजी घ्याल ?

घराबाहेर पडत असताना मास्क वापरावा

डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा

वारंवार हात धुवावेत, स्वच्छता बाळगावी

डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधं घ्यावीत.

हलक्या आणि पौष्टिक अन्नपदार्थांचा आहारात समावेश करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

SCROLL FOR NEXT