India Name Change Saam Tv
देश विदेश

ISRO बनणार BSRO, इंडिया गेट होणार भारत द्वार? देशाच्या नावातून INDIA वगळलं तर काय होईल...

India Name Change: ISRO बनणार BSRO, इंडिया गेट होणार भारत द्वार? देशाच्या नावातून INDIA वगळलं तर काय होईल...

Satish Kengar

India Name Change Effects:

आज दिवसभर सर्वत्र 'इंडिया'चे नाव बदलून 'भारत' ठेवण्याची चर्चा सुरु असल्याचं दिसून आलं. काही दिवसांनी विरोधकांनी एकत्र येऊन इंडिया आघीडीची स्थापना केली. या आघाडीवर भाष्य करताना सत्ताधारी भाजपने म्हटलं होतं की, ईस्ट इंडिया कंपनी आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या नावांशीही इंडिया जोडलेला आहे.

या नावाबाबतचा वाद कुठपर्यंत जाईल? तसेच घटनेत इंडियाचे नाव बदलून भारत करण्यात येईल की नाही, संसदेत विधेयक आणून काय निर्णय घेतला जाईल, या सगळ्याची आज जोरदार चर्चा झाली. इंडियाचे नाव जर भारत झाले, तर यामुळे कोणकोणत्या गोष्टीत बदल होऊ शकतो, याचा तुम्ही विचार केला आहे का? इंडिया हा शब्द असलेले प्रत्येक नाव बदलले जाईल का?

इंडियाचे नाव बदललं तर यामुळे परदेशी खेळाडूही दु:खी होऊ शकता, ज्यांनी आपल्या मुलीचे नाव देशाच्या नावावरून 'इंडिया' ठेवले आहे. याच्यामध्ये न्यूझीलंडचा उद्योगपती आणि माजी वेगवान गोलंदाज डिऑन नॅश यांचाही समावेश आहे. ज्याने आपल्या मुलीचे नाव इंडिया लिली नॅश ठेवले आहे. (Latest Marathi News)

इंडिया हे नाव बदललं तर याचा परिणाम भारतातील सर्व शैक्षणिक आणि संशोधन संस्थांच्या नावावरही होणार. त्यांच्यातील इंडिया हा शब्द काढून टाकल्यावर त्यांची नावे कशी असतील? एवढेच नाही तर भारताची ओळख आणि अभिमान बनलेल्या इंडिया गेट किंवा गेटवे ऑफ इंडियाचे नाव काय असेल. इंडिया गेटला भारत द्वार म्हणायचे का?

अलीकडेच चांद्रयान-३, आदित्य एल-1 मिशनमुळे जगभरात इस्रोचे कौतुक होत आहे. आता त्याचे नाव ISRO वरून BSRO केले जाईल का? सोशल मीडियावरही याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solar Eclipse: सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या चुका करु नये?

Maharashtra Live News Update: पुण्यात पावसाचा कहर, बंगळूर-पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Pune Crime: साईड नाही दिली, भररस्त्यावर घायवळ गँगच्या लोकांनी घातली गोळी

Hair Care Tips: बदलत्या हवामानामध्ये 'या' चुका टाळा, अन्यथा तुमचे केस गळणे कधीच थांबणार नाही

Adani Group News : हिंडनबर्ग प्रकरणी अदानी ग्रुपला सेबीकडून क्लीन चिट, गौतम अदानी म्हणाले...

SCROLL FOR NEXT