India halts defence deal with US worth ₹31,500 crore after Trump imposes 50% import tariff; Rajnath Singh’s US visit cancelled saam tv
देश विदेश

India- US Tariff: ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर! अमेरिकेसोबतच्या डीलला ब्रेक

India US Deal: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५०% कर लादण्याच्या निर्णयाला उत्तर म्हणून भारताने अमेरिकेसोबतचा ३१,५०० कोटी रुपयांचा संरक्षण करार थांबवलाय. वाढत्या व्यापारी तणावामुळे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा वॉशिंग्टन दौराही रद्द करण्यात आलाय.

Bharat Jadhav

  • ट्रम्प सरकारने भारतावर ५०% टॅरिफ लावल्याने भारत सरकारने त्वरित अ‍ॅक्शन घेतली.

  • भारताने अमेरिकेशी केलेला ३१,५०० कोटी रुपयांचा संरक्षण करार तात्पुरता स्थगित केला आहे.

  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा नियोजित अमेरिका दौरा रद्द करण्यात आला आहे.

  • या करारात अत्याधुनिक विमाने आणि शस्त्रसामग्री खरेदी होणार होती.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% कर लादण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आहे. भारतावर भरसाठ कर लादणाऱ्या अमेरिकेला भारताचा एका निर्णयामुळे घाम फुटलाय. भारताने अमेरिकसोबत करण्यात आलेल्या शस्त्रे आणि विमाने खरेदी करण्याचा करार तुर्तास पुढे ढकलला आहे.

या करारांतर्गत भारत पी-८आय पोसायडॉन विमाने, स्ट्रायकर कॉम्बॅट व्हेईकल्स, एन्ट्री मिसाईल टँक खरेदी करणार होता. यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह वॉशिंग्टनला जाणार होते, पण आता त्यांचा हा दौराही आता रद्द करण्यात आलाय. नवी दिल्लीने अमेरिकेकडून नवीन शस्त्रे आणि विमाने खरेदी करण्याचे नियोजन स्थगित केलंय. दोन्ही देशातील हा करार ३१,५०० कोटी रुपयांचा होता.

अमेरिकेने २९ जुलै रोजी भारतावर २५ टक्के कर लावल्याची घोषणा केली होती. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी पुन्हा २५ टक्के अतिरिक्त कर लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेला अतिरिक्त कर २१ दिवसांच्या आत लागू होणार आहे. म्हणजेच २७ ऑगस्ट २०२५ पासून हा कर लागू होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ ऑगस्ट रोजी भारताने रशियन तेल खरेदी केल्याबद्दल भारतीय वस्तूंवर २५% अतिरिक्त कर लादलाय. भारत रशियाकडून तेल विकत घेतो त्यातून रशियाला युद्धासाठी निधी पुरवत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केलाय.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे भारतावरील टॅरिफबाबत पहिल्यांदाच विधान समोर आले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाच्या उलट विधान परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी रशिया-युक्रेन युद्ध, भारत-रशिया भागीदारी आणि इतर मुद्द्यांवर चर्चा केली. याचदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना यावर्षाच्या अखेरपर्यंत भारतात येण्याचं निमंत्रण सुद्धा दिलं. दरम्यान आज झालेल्या फोनवरील चर्चेत पंतप्रधान मोदींनी परत एका रशिया युक्रेन युद्धाचा मुद्दा उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT