new corona virus  Google
देश विदेश

Corona Update : सावधान...कोरोनाची पुन्हा एन्ट्री! भारतात कोरोनाचे 93 रुग्ण,महाराष्ट्राचंही टेन्शन वाढलं, VIDEO

india Corona Update : भारतात कोरोनाची पुन्हा एन्ट्री झाली आहे. रुग्णांची संख्या 93 वर जाऊन पोहचली आहे. मुंबईतही रुग्णांच्या वाढत्या संख्येनं आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. पाहूया एक खास रिपोर्ट...

Saam Tv

मिताली माठकर, साम टीव्ही

हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड या आशीयाई देशांमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना भारतही सतर्क झालाय. कारण देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या आठवड्यात भारतात 58 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. ती संख्या आता ९३ वर गेली आहे. तर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ५३ वर पोहोचली. आज सोमवारी राज्यात एकही रुग्णाची नोंद झाली नाही. राज्यात रुग्ण होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्क्यांवर पोहोचले आहेत.

त्यानंतर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 93 झाली आहे. यापैकी 85 टक्के रुग्ण म्हणजेच 46 रुग्ण तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमधील आहेत. आता कोरोनाच्या चाचण्यांची संख्या कमी झाली आहे. त्या पार्श्वभूमिवर ही संख्या चिंतेची बाब आहे. अनेक रुग्णांमध्ये ताप आणि कोरोनाची लक्षणे आढळली आहेत.

मुंबईतही गेल्या 2 महिन्यांत कोरोनाचे 15 रुग्ण आढळून आले. मागील आठवड्यात आठ रुग्णांना कोरोनाची लागण झालीय. मुंबईच्या केईएम रुग्णालयात दोन कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. त्यातील एक किडनी तर एका रुग्णाला कॅन्सर झाला होता. पण हे मृत्यू कोविड-19ने झाले नसल्याचा स्पष्ट दावा रुग्णालय प्रशासनानं केला आहे. दरम्यान, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असं तज्ञांनी सांगितलंय

कोरोना झाल्यास काय काळजी घ्यावी पाहूयात...

काय काळजी घ्याल?

नागरिकांनी मास्क वापरावा

डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा

वारंवार हात धुवावे, स्वच्छता बाळगावी

डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित औषधं घ्या

हलक्या आणि पौष्टिक अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा

बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातही कोरोनाचा शिरकाव झालाय. अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोना झाला आहे. तर दुसरीकडे आयपीएलमधील काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद टीमचा खेळाडू ट्रेव्हिस हेडची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलीय. पाच वर्षांपूर्वीच्या कोरोनाच्या कटू आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. . त्यामुळे सद्यपरिस्थितीत सतर्क राहणे आणि काळजी घेणे हाच उत्तम उपाय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Heat Wave: यवतमाळमध्ये उष्णतेची लाट; ४८ तासात जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू

पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार; राहुल गांधींचा खळबळजनक दावा|VIDEO

Child Eye Care: लहान मुलांना जेवताना मोबाईल देताय? भविष्यात होऊ शकतात मोठे परिणाम, तज्ञांचा गंभीर इशारा

Maharashtra News Live Update: सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Crime News: आधी प्रेमाच्या आणाभाका; हॉटेलमध्ये नेत भांगेत कूंकू भरलं, नंतर अत्याचार अन्... विद्यार्थिनीसोबत नको ते घडलं

SCROLL FOR NEXT