Tehran Airstrikes saam tv
देश विदेश

इस्त्रायल- इराण युद्धात भारताची होरपळ, इराणमध्ये अडकले 10 हजार भारतीय,भारतीयांना कसं आणणार मायदेशी

India Plans Evacuation: इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणच्या तेहरान शहरात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. तर 10 हजार भारतीय इराणच्या तेहरानमध्ये अडकलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह भारतीयांना बाहेर काढण्यासाठी केंद्रानं काय योजना आखलीय? ती पाहूयात...

Omkar Sonawane

इस्त्रायलसोबत सलग पाचव्या दिवशी सुरु असलेल्या संघर्षादरम्यान परदेशी नागरिकांना देश सोडण्याची परवानगी दिलीय. इराणमध्ये सुमारे 10 हजार भारतीय नागरिक अडकलेत. त्यात 1500 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यात मोठ्या संख्येनं काश्मिरी विद्यार्थी आहेत. इराणमध्ये वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचं ते शिक्षण घेतायत. इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

भारतीयांसाठी केंद्राची योजना? (HDR)

10 हजार भारतीय नागरिक इराणमध्ये अडकले, त्यात 1500 विद्यार्थी

600 विद्यार्थी तेहरानहून सुरक्षित अशा कोम शहरात

110 विद्यार्थी उर्मियाहून आर्मेनिया सीमेकडे रवाना

शिराझ आणि इस्फहानमधील विद्यार्थी सुरक्षित याझद परिसरात

भारतीय दूतावासाकडून गुगल फॉर्म आणि टेलिग्राम लिंक जारी

इराणमधील बहुतेक आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या नागरी उड्डाणांसाठी बंद आहेत. त्यामुळेच आर्मेनिया सीमेवरून विद्यार्थ्यांना भारतात आणलं जाणार आहे. आर्मेनियाची सीमा इराणच्या प्रमुख शहरांपासून कमी अंतरावर आहे. तसेच भारताचे आर्मेनियाशी चांगले संबंध आहेत. केंद्राच्या या योजनेमुळे युद्धाची दाहकता वाढवण्याआधीच विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या मायदेशी आणलं जाणं शक्य होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

Jasprit Bumrah Retirement : टीम इंडियाला मोठा हादरा! जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

Nashik Food : नाशिकच्या Top 7 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Crime News: होम गार्डच्या परीक्षेवेळी तरुणी बेशुद्ध पडली; रुग्णालयात नेताना अ‍ॅम्ब्युलन्समध्येच सामूहिक बलात्कार

Nachni ladoo Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे लाडू

SCROLL FOR NEXT