India-Canada Conflict Saam Digital
देश विदेश

India-Canada Conflict: कॅनडाचे पंतप्रधान भारताविरोधात पुन्हा आक्रमक, अमेरिकेच्या दाव्यानंतर काय म्हणाले? जाणून घ्या

India-Canada Conflict: अमेरिकेने बुधवारी भारतीय नागरिकावर केलेल्या आरोपानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुन्हा भारतावर निशाणा साधला आहे. त्यामुळे निज्जर प्रकरणावरून दोन्ही देशांच्या ताणलेल्या संबंधामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Sandeep Gawade

India-Canada Conflict

अमेरिकेने बुधवारी भारतीय नागरिकावर केलेल्या आरोपानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुन्हा भारतावर निशाणा साधला आहे. त्यामुळे निज्जर प्रकरणावरून दोन्ही देशांच्या ताणलेल्या संबंधामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सहा महिन्यांपूर्वी हरदीप सिंह निज्जर या खलिस्तानी समर्थकाची कॅनडात हत्या करण्यात आली होती. त्यावरून कॅनडाने भारतावर आरोप केल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले आहेत.

अमेरिकेने भारतीय नागरिक निखिल गुप्तावर न्यूयॉर्क शहरातील नागरिकाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. यात पन्रूचं नाव घेण्यात आलेलं नाही. मागच्या आठवड्यात एका ब्रिटीश पर्तमानपत्राने, अमेरिकेने पन्नूच्या हत्येचा कट उधळवून लावल्याचा दावा केला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर निशाणा साधला आहे. अमेरिकेने भारतावर जे आरोप लावलेत, त्याविषयी आपण सुरुवातीपासून बोलत होतो. आता अमेरिकने केलेल्या या आरोपानंतर आमची अधोरेखित झाली आहे. त्यामुळे भारताने अशा प्रकारचे आरोप गांभीर्याने घेतले पाहिजेत, असं ट्रुडो यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी हरदीप सिंग या खलिस्तानी समर्थकाची कॅनडातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली होती. मात्र तब्बल दोन महिन्यांनंतर ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत भारतीय अधिकाऱ्यांचा या हत्येमागे हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध ताणले आहेत. भारतानेही कठोर भूमीका घेत कॅनडाच्या राजकीय तज्ज्ञांना भारतातून माघारी बोलावण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय पातळीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड या देशांनी कॅनडाची बाजू घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toyota Cars Offers: अंबाबाईच्या नावानं चांगभलं! फक्त ९९ रुपयांच्या हप्त्यांमध्ये घरी आणा कार, अन् ५ फ्री सर्विससह ४ धमाकेदार फायदे

Maharashtra Live News Update : डहाणूहून विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड

मुंबईत इमारतीला आग, घाबरलेल्या दोघांनी खिडकीतून मारली उडी, सुदैवानं....| VIDEO

Palak Pakoda Recipe : गरमागरम चहा अन् कुरकुरीत पालक भजी, पावसाळ्यात चटपटीत नाश्ता

High Court Notice To BCCI: आईशप्पथ, खेळाडूंनी फस्त केली ३५ लाखांची केळी, बीसीसीआयचा बीपी वाढला; हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडमध्ये

SCROLL FOR NEXT