India Bangladesh  saam tv
देश विदेश

India Bangladesh Trade: बांग्लादेशची धमकी, भारताचा ट्रेड स्ट्राईक चिकन नेकवर डाव, भारताचा घाव भारतानं केली बांग्लादेशची नाकेबंदी

Tensions Rise: भारताला धमकी देणं आता बांग्लादेशला चांगलंच महागात पडलंय... कारण भारतानं थेट बांग्लादेशची नाकेबंदी केलीय... पाहूयात याच नाकेबंदीवरचा हा स्पेशल रिपोर्ट.....

Bharat Mohalkar

भारतानं पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशांनंतर आता आपला मोर्चा बांग्लादेशकडे वळवलाय...भारतानं तुर्की, अझरबैजाननंतर आता बांग्लादेशवर ट्रेड स्ट्राईक केलाय... बांग्लादेशातून बंदरामार्गे येणाऱ्या वस्तुंवर भारतानं निर्बंध घातलेत तर भुमार्गाने होणारा व्यापार रोखण्यात आलाय...

तयार कपडे, प्रक्रिया केलेले खाद्य पदार्थ, बेक्ड वस्तू, पीव्हीसी, डाय यावर निर्बंध

चांगरबांधा आणि फुलबाडी सीमा चौक्या बंद

जेएनपीटी आणि कोलकत्ता बंदरातूनच आयातीचा मार्ग मोकळा

तिसऱ्या देशात माल पाठवण्यासाठीची ट्रान्सशीपमेंट सुविधा बंद

मासे, एलपीजी, खाद्य तेल आणि क्रश्ड स्टोनवर निर्बंध नाही

नेपाळ आणि भुतानला जाणाऱ्या मालावर निर्बंध नाही

बांग्लादेशमध्ये झालेल्या तख्तापालटानंतर मोहम्मद युनूस काळजीवाहू पंतप्रधान बनले.. मात्र त्यानंतर त्यांनी सातत्यानं भारतविरोधी भूमिका घेतल्याचं समोर आलं.... त्यातच आता पाणी डोक्यावरुन जाण्यास सुरुवात झालीय.. त्याला कारण ठरलंय बांग्लादेशचे काळजीवाहू पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी थेट चीनमध्ये जाऊन भारताविरोधात केलेलं वक्तव्य.... मात्र मोहम्मद युनूस नेमकं काय म्हणाले होते? पाहूयात....

भारताचे ईशान्यकडील राज्य लँडलॉक्ड

या राज्यांना समुद्रामार्गे जाण्यासाठी बांग्लादेश हाच पर्याय

चिकन नेक म्हणजे सिलुगुडी कॉरिडॉरवर अप्रत्यक्ष भाष्य

तीस्ता नदी व्यवस्थापन प्रकल्पात चीनच्या सहभागाचे आवाहन

बांग्लादेशच्या स्वातंत्र्यापासून भारत आणि बांग्लादेशमधील संबंध मैत्रीपूर्ण राहिले आहेत.. मात्र आता मोहम्मद युनूस चीनकडे झुकल्याचं चित्र आहे... एवढंच नाही तर त्यांनी भारताच्या कुरापती काढण्यास सुरुवात केलीय...त्यामुळे भारताच्या दणक्यानंतर आतातरी बांग्लादेशचं डोकं ठिकाणावर येणार की युनूस यांच्या कुरापती सुरुच राहणार? याकडे लक्ष लागलंय... मात्र आता युनूस यांनी पुन्हा कुरापत काढल्यास भारत त्यांचं नाक दाबू शकतो, हे लक्षात ठेवावं....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडणार, आज फैसला होणार?

Maharashtra Live News Update : लोणावळा रेल्वे मार्गावर १० दिवस ब्लॉक

Khandvi Recipe: नाश्त्याला झटपट बनवा गुजराती स्टाईल खांडवी, मिनिटात होईल फस्त

Kankavli Politics : आमदार निलेश राणे संदेश पारकरांच्या घरी, मंत्री उदय सामंत उपस्थित

Success Story: रोज ७-८ तास अभ्यास, रेल्वेत नोकरी करत दिली UPSC; तिसऱ्या प्रयत्नात IAS; रिया सैनी यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT