Bihar E-Voting Saam Tv
देश विदेश

Assembly Election: ५ राज्यात कोणाचं सरकार येणार? विधानसभा निवडणुकांचा धक्कादायक सर्व्हे आला समोर

Five State Assembly Election Survey: व्होट व्हायब आणि इंक इनसाइट्स या संस्थांनी देशातील ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचा सर्व्हे जाहीर केलाय. यात धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहे.

Bharat Jadhav

पाच राज्यांच्या अलिकडच्या सर्वेक्षणात आश्चर्यकारक आकडेवारी समोर आलीय. या सर्व्हेत केरळ, तामिळनाडू, आसाम, बिहार आणि बंगालचा समावेश आहे. भारतातील पाच प्रमुख राज्यांमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी, व्होट व्हायब आणि इंक इनसाइट्स संस्थांनी सर्व्हे जाहीर केलाय. या संस्थेच्या सर्व्हेतून धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहे.याबाबतचे वृत्त एबीपी हिंदीने दिले आहे.

या राज्यातील जनमत बदलेल दिसत आहे. सर्व्हे करणाऱ्या संस्थांनी केलेल्या सर्व्हेत मतदारांना काही प्रश्न केली होती. त्या प्रश्नांच्या आधारे त्यांनी या पाच राज्यातील मतदारांचा कौल जाणून घेतलाय. व्होट व्हायबच्या सर्वेक्षणात केरळमध्ये लोक कोणत्या पक्षावर सर्वात जास्त विश्वास ठेवतात असा प्रश्न विचारण्यात आला होता? या प्रश्नाच्या उत्तरात यूडीएफला ३८.९% लोकांचा पाठिंबा मिळाला. तर विद्यमान मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफला २७.८% लोकांनी पसंती दिलीय. एनडीएला २३.१% तर इतरांना ४.२% लोकांनी सहमती दर्शवलीय.

केरळसह तामिळनाडूमध्ये धक्कादायक बाब समोर आलीय. तामिळनाडूमध्ये, ३७% लोक द्रमुकला योग्य पर्याय मानत आहेत. तर एआयएडीएमकेला ३३% आणि टीव्हीकेला १२% लोकांनी पाठिंबा दिलाय. सीएम स्टॅलिन सरकारच्या विरोधात ४१% लोकांनी मत दिलंय. तर ३१% लोक सरकारच्या बाजूने आहेत. एकंदरीत, द्रमुक आघाडीवर आहे, परंतु जनतेमध्ये नाराजी देखील दिसून येतेय.

आसाममध्ये भाजपला ५०% तर काँग्रेसला ३९% लोकांनी पाठिंबा दिलाय. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ४६% लोक हेमंत बिस्वा शर्मा यांच्या बाजूने आहेत. तर ४५% लोक गौरव गोगोई यांना पसंत करत आहेत. दोन्हीमधील हा फरक खूपच कमी आहे. या राज्यांप्रमाणे बिहारमध्ये धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. या राज्यात इंक इनसाइट्स आणि सी व्होटरच्या मते, बिहारमध्ये एनडीएला ४८.९% आणि महाआघाडीला ३५.८% पाठिंबा मिळालाय.

मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर ३८% लोक तेजस्वी यादव आणि ३६% लोक नितीश कुमार यांना पसंती देत आहेत. तर चिराग पासवान आणि सम्राट चौधरी यांना अनुक्रमे ५% आणि २% लोक पसंती देत आहेत. पश्चिम बंगालमधील व्होट व्हायबनुसार, ४१.७% लोक ममता बॅनर्जी यांनाच मुख्यमंत्री म्हणून पसंत करत आहेत. शुभेंदु अधिकारी यांना २०.४%, सुकांता मजुमदार यांना ९.७% आणि अभिषेक बॅनर्जी यांना ५.३% लोकांचा पाठिंबा मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben Stokes vs Siraj : सिराजच्या एका चेंडूनं बेन स्टोक्स व्हिवळला! थेट गुडघ्यावर बसला; पुन्हा उठताच येईना, VIDEO

Shocking : सख्ख्या ३ लहान बहिणींचा मृत्यू, अन्नातून झाली होती विषबाधा; ठाण्यातील धक्कादायक घटना

Mumbai Local Train: रेल्वे प्रवासी मित्रांनो कृपा लक्ष द्या! मध्य,हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक; जाणून घ्या किती वेळ बंद असेल लोकल

Maharashtra Live News Update: - माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयाबाहेर पत्ते खेळून आंदोलन

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे हेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतात; शरद पवार गटाच्या आमदाराचा दावा

SCROLL FOR NEXT