India and Pakistan continue nuclear confidence-building measures by exchanging nuclear facilities lists under the 1988 agreement. saam tv
देश विदेश

India-Pakistan Nuclear Power: भारत-पाकिस्तान कट्टर वैरी तरीही एकमेकांना दिली परमाणू ठिकाणांची यादी; काय आहे कारण?

India-Pakistan Both Countries Share Nuclear Sites List: दोन देशातील कराराअंतर्गत भारत आणि पाकिस्तानने त्यांचे अणुप्रकल्प आणि कैदी आणि मच्छिमारांच्या यादी एकमेकांना दिल्या आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर संबंध ताणले गेले आहेत तरी दोन्ही देशांनी एकमेकांना ही माहिती का दिली हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • भारत-पाकिस्तानने परमाणु ठिकाणांची यादी अदलाबदल केली

  • ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यानंतरही करार कायम

  • 1988 च्या अणु कराराअंतर्गत ही देवाणघेवाण

पहलगाम हल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरची कारवाई केली होती. या कारवाईत भारताने पीओकेमधील दहशतवादी ठिकाणांना उद्धवस्त केलं. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव निर्माण झाला आहे. तरीही या दोन्ही देशांनी एकमेकांना आपल्या परमाणू स्थळांची माहिती दिली आहे. असं का झालं हे जाणून घेऊ.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एका करारानुसार, एकमेकांना आपल्या देशातील परमाणू स्थळांची यादी दिलीय. हा करार दोन्ही पक्ष परमाणू ठिकाणावर हल्ला करण्यापासून रोखलं जातं. नववर्षाच्या सुरुवातीलाच हा हे करण्यात आलंय. हे तीन वर्षांपासून करारानुसार माहिती दिली जातेय.

गेल्या मे महिन्यात पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरपासून दोन्ही देशांमधील संबंध खराब झालेत. याच दरम्यान दोन्ही देशांमध्ये अणुस्थळांच्या यादीची देवाणघेवाण करण्यात आलीय. गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानने आज नवी दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये एकाच वेळी राजनैतिक माध्यमांद्वारे अणू स्थळांची आणि सुविधांच्या यादीची देवाणघेवाण करण्यात आली.

या करारांतर्गत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अणू स्थळांच्या ठिकाणांवर आणि सुविधांवरील हल्ल्यांना प्रतिबंधित करण्यात येतं. या करारावर ३१ डिसेंबर १९८८ रोजी स्वाक्षरी करण्यात आली आणि पहिल्यांदा २७ जानेवारी १९९१ रोजी अंमलात आला. दोन्ही देशांमधील अणुस्थळांची यादी एकमेकांना देण्याची ही ३५ वी वेळ आहे. ही यादी पहिल्यांदा १ जानेवारी १९९५ रोजी एकमेकांना देण्यात आली होती, असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

अणू स्थळांसह २००८ मध्ये झालेल्या द्विपक्षीय करारानुसार दोन्ही देशांनी नवी दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये एकाच वेळी राजनैतिक माध्यमांद्वारे एकमेकांच्या ताब्यात असलेल्या नागरी कैद्यांच्या आणि मच्छिमारांच्या याद्यांची देवाणघेवाण केली. भारताच्या ताब्यात असलेल्या पाकिस्तानी ३९१ नागरी कैद्यांची आणि ३३ मच्छीमारांची यादी पाकिस्तानला देण्यात आलीय. याचप्रमाणे पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात असलेल्या भारतीय ५८ नागरी कैद्यांची आणि १९९ मच्छिमारांची यादी भारताला दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारने पाकिस्तानच्या ताब्यातून नागरी कैदी, मच्छीमार आणि त्यांच्या बोटी आणि बेपत्ता भारतीय संरक्षण कर्मचाऱ्यांची लवकर सुटका आणि मायदेशी परत पाठवण्याची मागणी केलीय. पाकिस्तानकडे भारत सरकारने त्यांच्याकडे असलेल्या १६७ भारतीय मच्छीमार आणि नागरी कैदी ज्यांची शिक्षा पूर्ण केली आहे त्यांची सुटका करण्यात यावी. त्यांना मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया जलदगतीने करावी असे आवाहन केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब? राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याणमध्ये मोठी राजकीय घडामोड; दोन दिग्गज नेत्यांची एकत्र बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

Ladki Bahin eKYC: थर्टी फर्स्टची डेडलाईन तरी ई-केवायसी सुविधा सुरूच; लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक घोळ?

Friday Horoscope : नव्या वर्षाचा पहिला शुक्रवारी ठरेल लकी; जुळणार प्रेमाच्या रेशीम गाठी, ५ राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT