Assembly Bypoll 2024 Saam Tv
देश विदेश

Assembly Bypoll 2024: पुन्हा NDA विरुद्ध INDIA आघाडी! 7 राज्यांच्या 13 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक, काय आहे राजकीय समीकरण?

Assembly By-Election: 10 जुलै रोजी सात राज्यांतील 13 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. यात पुन्हा NDA विरुद्ध INDIA आघाडी पाहायला मिळणार.

साम टिव्ही ब्युरो

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. एनडीए आणि इंडिया आघाडी आता पुन्हा आमनेसामने येणारआहे. 10 जुलै रोजी सात राज्यांतील 13 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.

यामध्ये पश्चिम बंगालच्या 4 जागांचा समावेश आहे. ज्या विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे, त्यात बिहारच्या रुपौली, पश्चिम बंगालच्या रायगंज, राणाघाट दक्षिण, बगदाह आणि माणिकतला या जागांचा समावेश आहे. तामिळनाडूची विक्रवंडी, मध्य प्रदेशातील अमरवाडा, उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगलोर आणि पंजाबमधील जालंधर पश्चिम या जागा आहेत.

बंगालच्या चार जागांवर काय आहे राजकीय समीकरण?

माणिकतला ही पश्चिम बंगालमधील काँग्रेसची परंपरागत जागा होती. मात्र आता ती तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला बनली आहे. 20 फेब्रुवारी 2022 रोजी टीएमसीचे विद्यमान नेते साधन पांडे यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. 2021 मध्ये रायगंजची जागा भाजपने जिंकली होती. मात्र नंतर आमदार कृष्णा कल्याणी यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला. त्यांना रायगंजमधून लोकसभेचे तिकीट मिळालं. पण भाजप उमेदवार कार्तिक पॉल यांच्याकडून ते निवडणुकीत पराभूत झाले.

2021 मध्ये भाजपने उत्तर 24 परगना ही जागा जिंकली होती. मात्र विजयी उमेदवार बिस्वजित दास टीएमसीमध्ये परतले. लोकसभा निवडणुकीत दास यांना टीएमसीकडून तिकीट मिळाले होते. पण बोनगाव मतदारसंघात भाजपच्या शंतनू ठाकूर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. राणाघाट दक्षिण विधानसभेची जागाही रिक्त आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे आमदार मुकुटमणी अधिकारी यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला. आता भाजपचे मनोज कुमार हे पुन्हा टीएमसीचे उमेदवार म्हणून विश्वास यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.

हिमाचल पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने ताकद लावली पणाला

हिमाचल प्रदेशातील देहरा, नालागढ आणि हमीरपूर येथे विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी काँग्रेसने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. पक्षातील सर्व नेते मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री, प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांच्यासह सर्व मंत्र्यांनी तीन विधानसभा मतदारसंघात कामाला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanteras 2025: आज धनत्रयोदशी आणि शुभ ग्रहयोग! खरेदी, गुंतवणूक आणि भाग्य उघडण्यासाठी सर्वोत्तम दिवस

Gopichand Padalkar : हिंदू मुलींविषयी तालिबानी मानसिकतेचं वक्तव्य, भाजप नेते पडळकर नेमकं काय म्हणाले?

Virat Kohli : विराटचा पाकच्या झेंड्यावर ऑटोग्राफ? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Maharashtra Live News Update : ठाकरेंची नवी युवा पिढी एकाच फ्रेममध्ये

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

SCROLL FOR NEXT