Rahul Gandhi and Akhilesh Yadav Saam Tv
देश विदेश

Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला, काँग्रेस 17 जागांवर लढणार निवडणूक; सपा किती?

Uttar Pradesh: लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी एकत्र निवडणूक लढवण्याची औपचारिक घोषणा केली.

Satish Kengar

Lok Sabha Election 2024:

लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी एकत्र निवडणूक लढवण्याची औपचारिक घोषणा केली. उत्तर प्रदेशात काँग्रेस 80 पैकी 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. सपा आणि त्यांचे मित्रपक्ष इतर 63 जागांवर निवडणूक लढवतील.

यातच काँग्रेसने मध्य प्रदेशात सपाला एक जागा दिली आहे. मध्य प्रदेशातील खजुराहो मतदारसंघातून सपा निवडणूक लढवणार आहे. यूपीमध्ये सपाने आपली एक जागा आझाद समाज पक्षाला दिली आहे. नगीना जागेवर त्यांचे नेते चंद्रशेखर आझाद निवडणूक लढवतील. सपाने रायबरेली, अमेठी, कानपूर नगर, फतेहपूर सिक्री, बांसगाव, सहारनपूर, प्रयागराज, महाराजगंज, वाराणसी, अमरोहा, झाशी, बुलंदशहर, गाझियाबाद, मथुरा, सीतापूर, बाराबंकी, देवरिया या जागा काँग्रेसला दिल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बुधवारी सपा आणि काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी लखनऊमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाबाबत घोषणा केली. काँग्रेसच्या वतीने प्रदेश प्रभारी अविनाश पांडे, प्रदेशाध्यक्ष अजय राय उपस्थित होते. सपाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल आणि प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.  (Latest Marathi News)

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेनंतर दोन्ही पक्षात जागावाटप निश्चित झाली, असं सांगण्यात येत आहे. यानंतर अखिलेश यादव यांची देखील यावर प्रतिक्रिया आली असून त्यांनी युती होणार असल्याचे स्पष्ट केले.

जागावाटपाबाबत सपाचा काँग्रेसशी कोणताही वाद नाही, असंही त्यांनी सांगितल्याचं बोललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुस, जागांच्या संख्येवरून कोणताही वाद नव्हता, तर काँग्रेसला कोणत्या जागा द्यायची यावरून चर्चा सुरु होती. दरम्यान, आज काँग्रेसला मिळालेल्या जागांपैकी वाराणसी-अमरोहासह काही जागांवर सपानेही आपले उमेदवार उभे केले आहेत. आता सपा आपले उमेदवार मागे घेणार असून काँग्रेसकडून नावे जाहीर केली जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT