Rahul Gandhi  saam tv
देश विदेश

देशभरातून खासदार-आमदार दिल्लीत दाखल; ३ प्रमुख मागण्यांसाठी थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा, राहुल गांधींची आक्रमक प्रतिक्रिया

Rahul Gandhi latest news : मतदार यादीतील कथित अनियमितता, व्होट चोरीचे आरोप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून इंडिया आघाडीने दिल्लीत सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चाचे आवाहन केले आहे.

Namdeo Kumbhar

INDIA alliance march to Supreme Court in Delhi : देशाची राजधानी दिल्लीमध्ये आज राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. मतदारयाद्यांमधील कथित अनियमितता, 'व्होट चोरी'चे आरोप आणि मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज 'इंडिया' आघाडीकडून दिल्लीत मोर्चा काढण्यात येणार आहे. एका बाजूला दिल्लीत अचानक सुरू झालेला पाऊस आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांनी लावलेले कडेकोट रस्ते निर्बंध अशा आव्हानात्मक परिस्थितीतही देशभरातून आलेले काँग्रेसचे खासदार व आमदार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

सरन्यायाधीशांची भेटीची वेळ देण्यास स्पष्ट नकार

आंदोलनापूर्वी 'इंडिया' आघाडीच्या शिष्टमंडळाने सरन्यायाधीशांकडे दुपारी ४ ते ५ या वेळेत भेटीसाठी आणि आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र, सरन्यायाधीशांनी ईमेलद्वारे विरोधकांना उत्तर पाठवत ही भेट नाकारली. या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना, "तुमच्या विषयाच्या अनुषंगाने योग्य ती याचिका न्यायालयात दाखल केल्यास त्यावर कायदेशीर सुनावणी घेतली जाईल," अशी भूमिका सरन्यायाधीशांनी स्पष्ट केली.

गेल्या काही दिवसांतील पार्श्वभूमी

या आंदोलनाची पाळेमुळे मागील काही दिवसांत रोखलेली आहेत. याआधी ६, ७, ८ आणि ९ ऑक्टोबर असे सलग चार दिवस विरोधकांनी याच मुद्यांवरून दिल्लीत तीव्र निदर्शने केली होती. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना तीन वेळा ताब्यात घेतले होते. इतकेच नाही तर ९ ऑक्टोबर रोजी विरोधी पक्षांच्या खासदारांच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले होते.

दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि ट्रॅफिक अडथळे

काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंतच्या या विरोध मार्चच्या आवाहनामुळे दिल्ली वाहतूक पोलिसांनी सोमवारसाठी आधीच कडक ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी केली होती. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सकाळी ६ वाजल्यापासूनच अनेक संवेदनशील भागांमध्ये रस्ते डायव्हर्ट करण्यात आले होते.

राहुल गांधींचे आक्रमक ट्विट

आंदोलनापूर्वी राहुल गांधींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, काल दिल्लीत देशवासी शांततेने रस्त्यावर उतरले होते, पण त्यांना पोलिसांनी आणि भाजपच्या गुंडांनी मारहाण केली. आम्ही अशा प्रकारचा भारत अजिबात पाहू इच्छित नाही. आज आम्ही सर्व पक्षांचे नेते, महिला-पुरुष आणि देशातील नागरिक एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयापर्यंत मार्च करू. आमची मुख्य मागणी आहे की, मतदारांच्या अधिकारांवर डल्ला मारणे थांबले पाहिजे, एसआयआरवर (SIR) रोक लागली पाहिजे आणि ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. कोणतीही ताकद आमचा आवाज दाबू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Monsoon Update : मुसळधार पाऊस झोडपणार! २४ राज्यांना अलर्ट जारी; महाराष्ट्रात कसं असेल हवामान? वाचा

भीमनवार सक्तीच्या रजेवर, मुंढेंच्या हाती सूत्रे! पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित, मध्यरात्री मोठ्या घडामोडी

Tea Leaves : फक्त १ चमचा चहापत्ती आणि केस होतील मजबूत, आठवडाभरात दिसेल चमत्कारिक फरक

SCROLL FOR NEXT