india pakistan news  saam tv
देश विदेश

India Strikes Pakistan: पाकिस्तानवर AI हल्ला, पाकच्या लष्करी तळांवर अचूक हल्ले, AI मुळे हल्ले रोखण्यात भारताला यश

AI Warfare: भारतानं AI च्या मदतीनं पाकवर अचूक हवाई हल्ले केले. मात्र लष्करात AI चा वापर करण्याचे नियोजन सहा वर्षांपासून सुरु होते. AIचा वापर नेमका कसा करण्यात आला ? जाणून घेऊया या रिपोर्टमधून...

Girish Nikam

ऑपरेशन सिंदुरमधून भारताने पाकमधील दहशतवाद्यांची नऊ स्थळ अचूक उद्ध्वस्त केली. या कारवाईमध्ये भारतीय संरक्षण दलांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AIचा नेमका आणि योग्य वापर केला. त्यामुळेच पाकिस्तानने केलेले हवाई हल्ले अचूक ओळखले गेले आणि यशस्वीपणे परतवूनही लावले. जाणून घेऊया हा AIचा वापर नेमका कसा करण्यात आला.

१)भारतीय लष्कराने AI-आधारित क्लाऊडवर चालणारी एकात्मिक एअर कमांड आणि कंट्रोल सिस्टीम वापरली

२) आकाशातील शत्रूच्या कोणत्याही वस्तूंचा शोध घेतला आणि त्यांची स्थिती निश्चित केली

३) या तंत्रज्ञानामुळे पाकिस्तानच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना काही सेकंदात नष्ट करणे शक्य झाले. विशेष म्हणजे नागरी हानी टाळण्यातही मदत झाली.

४) या यंत्रणेच्या वापरामुळेच हवाई हल्लाविरोधी संरक्षक कवच सीमावर्ती भागात तयार झाले. ते भेदण्यात पाकिस्तानला अपयश आले.

5) AI च्या युद्धातील परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन केला होता. याची तयारी 2018 पासून सुरू झाली होती.

6) शत्रूची घुसखोरी उघड करून प्रतिहल्ला करणारी ‘इंटरसेप्ट मॅनेजमेंट सिस्टीम’ ही यंत्रणा AI च्या मदतीनेच विकसित केली आहे

शत्रूच्या विमानांच्या हालचालीवरून त्यांची ओळख पटवून वर्गीकरण करणारी यंत्रणा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीने DRDO च्या सहकार्याने AIच्या आधारे विकसित केली. यामुळे हवाई हल्लाविरोधी यंत्रणा अधिक सक्षम झाली. ‘Centre for Artificial Intelligence & Robotics’ (CAIR) या संस्थेने ‘Air Defence Control and Reporting System’ विकसित केली आहे. ही प्रणाली हवाई हल्ले वेळीच ओळखते. नियोजित लक्ष्यापासून दूर असतानाच ते निष्प्रभ करण्याचे काम करते. याशिवाय हवाई हल्लाविरोधी सर्व यंत्रणांची माहिती एकत्र करून त्यात समन्वय साधते. भारतीय लष्कराच्या या अत्याधुनीक यंत्रणेमुळेच सपाटून मार खालेल्ल्या पाकिस्तानची पुन्हा वाकड्या नजरेने भारताकडे पाहण्याची हिम्मत होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT