future prediction of India disasters 
देश विदेश

Astrology Alert: मंदिरात चेंगराचेंगरी, रेल्वेची भयानक दुर्घटना; पुढील ५ महिने धोक्याचे, ज्योतिषाची चेतावणी

Astrologer Sanjeev Malik viral video : मंदिरातील चेंगराचेंगरी, रेल्वे दुर्घटना आणि पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींचा इशारा दिला आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये मथुरा किंवा उत्तर भारतातील मंदिरात चेंगराचेंगरी होऊ शकते.

Namdeo Kumbhar

  • ज्योतिष संजीव मलिक यांनी 'सुपरटॉक्स' पॉडकास्टवर मोठ्या दुर्घटनांचा इशारा दिला.

  • नोव्हेंबर 2025 मध्ये उत्तर भारतात चेंगराचेंगरी होण्याची शक्यता.

  • पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढण्याची शक्यता.

  • पुढील ५ महिने भारतासाठी अत्यंत धोक्याचे असल्याचे भाकीत.

future prediction of India disasters : २०२५ वर्षाच्या सहा ते सात महिन्यात अनेक भयंकर अन् भीषण दुर्घटना आपण पाहिलाय. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत भारतात अन् जगात अनेक भयंकर अन् काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटना उघड्या टोळ्यांनी पाहिल्यात. त्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटना, महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, मुंबई आणि जळगावमध्ये रेल्वे दुर्घटना, आरसीबीच्या विजयत्सोवात चेंगराचेंगरी, पहलगाम दहशतवादी हल्ला यासह मागील सात महिन्यात भारतामध्ये अनेक भयानक अन् हादरवण्याऱ्या घडामोडी, दुर्घटना घडल्या आहेत. २०२५ वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाईटच होणार असल्याचे सांगण्यात येतेय. सध्या एका ज्योतिषाची भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्यामध्ये पुढील पाच महिन्यात मोठ्या दुर्घटना होणार असल्याचे भाकीत करण्यात आलेय.

‘सुपरटॉक्स’ या पॉडकास्टवर ज्योतिषी संजीव मलिक यांनी पुढील पाच महिन्यात भारतात काय काय होऊ शकते, याचे भाकीत केलेय. नोव्हेंबर महिन्यात भारातमध्ये एक मोठी चेंगराचेंगरीची घटना घडू शकते. त्याशिवाय रेल्वेचा मोठा अपघात होण्याचा अंदाजही वर्तवला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

मंदिरात चेंगराचीचा इशारा

‘सुपरटॉक्स’ नावाच्या पॉडकास्टवर ज्योतिषी संजीव मलिक यांनी भारताच्या भविष्याबद्दल काही भाकीत नोंदवली आहेत. त्यांनी सांगितलं की, नोव्हेंबर 2025 मध्ये एखाद्या मंदिरात चेंगराचेंगरीसारखी घटना घडू शकते. जेव्हा पॉडकास्ट होस्टने असं सुचवलं की ही घटना कदाचित दक्षिण भारतात घडू शकते, तेव्हा संजीव मलिक यांनी उत्तर दिलं की, ते नेमकं ठिकाण सांगू शकत नाहीत, पण त्यांच्या मते ही घटना उत्तर भारतात, विशेषतः मथुरेत घडण्याची शक्यता आहे.

भयंकर पाऊस अन् मोठी रेल्वे दुर्घटना -

संजीव मलिक यांनी यासोबतच यंदाच्या पावसाळ्याबाबतही इशारा दिला. ते म्हणाले की, यावेळचा पाऊस लोकांसाठी खूप अडचणी घेऊन येईल. नैसर्गिक आपत्ती लोकांना खूप त्रास देतील, डोंगराळ भागात प्रवास टाळणं चांगलं ठरेल, असाही अंदाज वर्तवला आहे. मलिक यांच्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात मोठी दुर्घटना घडू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT