Income Tax Department notice to Congress, Rahul Gandhi  Saam TV
देश विदेश

Breaking News: लोकसभेपूर्वी काँग्रेसला दुहेरी झटका; आयकर विभागाने बजावली १७०० कोटींची नवी नोटीस

Lok Sabha Election 2024: ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसला दुहेरी झटका बसला आहे. दिल्ली हायकोर्टाने याचिका फेटाळून लावल्यानंतर आता आयकर विभागाने काँग्रेसला तब्बल १७०० कोटी रुपयांची नवी नोटीस बजावली आहे.

Satish Daud

Income Tax Department notice to Congress

ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसला दुहेरी झटका बसला आहे. दिल्ली हायकोर्टाने याचिका फेटाळून लावल्यानंतर आता आयकर विभागाने काँग्रेसला तब्बल १७०० कोटी रुपयांची नवी नोटीस बजावली आहे. २०१७-१८ ते २०२०-२१ पर्यंतच्या कालावधीतील पेनल्टी व व्याजाची थकीत रक्कम भरण्यासाठी आयकर विभागाने ही नोटीस पाठवली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यापूर्वी देखील आयकर विभागाने काँग्रेसला (Congress) नोटीस पाठवली होती. थकीत रक्कम न भरल्यामुळे आयकर विभागाने काँग्रेसला २१० रुपयांचा दंडही ठोठावला होता. यासोबत काँग्रेसची बँक खाते देखील गोठवण्यात आली होती. आयकर विभागाच्‍या या कारवाईविरोधात काँग्रेसने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मात्र, या प्रकरणावर सुनावणी घेताना उच्च न्यायालयाने (High Court) काँग्रेसला दिलासा देण्यास नकार दिला. न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठाने काँग्रेस पक्षाची याचिका फेटाळून लावली. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताच आयकर विभागाने काँग्रेसला नवीन नोटीस बजावली आहे.

२०१७-१८ ते २०२०-२१ पर्यंतच्या कालावधीतील पेनल्टी व व्याजाची थकीत रक्कम भरण्याचे आयकर विभागाने सांगितले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला दुहेरी झटका बसला असून अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांची गळचेपी केली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांवर अशा प्रकारे कारवाया करणे लोकशाहीसाठी घातक असल्याचं काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि वकील विवेक तन्खा यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेस पक्ष आयकर विभागाच्या या नोटीसीला कायदेशीर मार्गाने उत्तर देईल आणि पाठपुरावा करेल, असं तन्खा यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विधानपरिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर

Train Accident : कर्जतजवळ मालगाडी रुळावरून घसरली; मुंबई- पुणे रेल्वे मार्ग ठप्प, नेमकं काय घडलं?

धक्कादायक! सापासोबत स्टंटबाजी करनं महागात पडलं; ३० वर्षीय तरुणाचा कोब्राच्या दंशाने मृत्यू|VIDEO

Ashram School : आदिवासी आश्रम शाळेतील १३ विद्यार्थीना विषबाधा; पाच विद्यार्थीनी गंभीर, रुग्णालयात उपचार सुरु

Railway OHE Poles : रेल्वे ट्रॅकजवळील पोलवर असलेल्या या आकड्यांचा अर्थ काय? जाणून घ्या नेमकी माहिती

SCROLL FOR NEXT