Money
Money  Saam Tv
देश विदेश

येत्या 1 ऑक्टोबरपासून काय आर्थिक बदल होणार? तुमच्या पैशांची बचत होणार की खर्च वाढणार?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सरकारकडून महिन्याच्या सुरुवातीला अर्थविषयक अनेक बदल केले जातात. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होत असतो. पुढील ऑक्टोबर महिन्यापासूनही अनेक बदल (Financial Changes From 1st October) होणार आहेत. काहींचा थेट तुमच्या खिशावरही परिणाम होईल. नेमके हे बदल कोणते आहेत याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.

कार्ड टोकनायझेशन

डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या (Debit Credit Card) फसवणुकीच्या वाढलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने मोठा निर्णय घेतला आहे. RBI ने सर्व क्रेडिट आणि डेबिट कार्ड टोकनायझेशन सेवा सुरु केली आहे. यापूर्वी हे युनिक टोकन 30 जूनला दिले जाणार होते. मात्र रिझर्व्ह बँकेने याला मुदतवाढ दिली होती. म्हणजेच, तुमचे कार्ड टोकनाईज केले जाईल जे 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यामुळे तुम्ही Amazon, Flipkart ऑनलाईन शॉपिंग साईट्सवरुनवरून खरेदी करण्यास वापरू शकता. त्यामुळे तुम्ही टोकनायझेशनची संपूर्ण माहिती घेऊन तुमचे कार्ड एका युनिक टोकनमध्ये रूपांतरित करु शकता. यामुळे तुमचे क्रेडिट डेबिट कार्डचे व्यवहार सुरक्षित राहतील.

गॅस सिलेंडरच्या किंमती कमी होऊ शकतात

एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमतींचा दर महिन्याच्या 1 तारखेला आढावा घेतला जातो आ णि त्यानंतर दरात कपात करायची की काही रुपयांनी वाढ करायची याचा निर्णय घेतला जातो. अशा स्थितीत कच्च्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती कमी झाल्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. यावेळी घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे.

अटल पेन्शन योजनेत मोठे बदल

येत्या 1 ऑक्टोबरपासून अटल पेन्शन योजनेत बदल करण्यात येणार असून, त्याअंतर्गत आयकर भरणाऱ्या ग्राहकांना अटल पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही. आतापर्यंतच्या नियमांनुसार 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. या योजनेअंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 5 हजार रुपये पेन्शन दिली जाते. यासाठी 20 वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला 210 रुपये जमा करावे लागतील.

स्मॉल सेविंग स्कीममध्ये मोठे बदल होण्याची शक्यता

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर बहुतेक बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. अशा परिस्थितीत आता सीनियर सिटीजन सेविंग स्कीम, पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम सारख्या पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेतील व्याजदरातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांवर या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी नवीन व्याजदरांची घोषणा केली जाऊ शकते.

डिमॅट खात्याच्या नियमांमध्ये बदल होणार

डिमॅट खातेधारकांनी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत त्यांच्या खात्यांमध्ये टू फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रोसेस पूर्ण न केल्यास त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण यामुळे डीमॅट खात्यात लॉग-इन करू शकणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ED, CBI तुमच्या हातातील बाहुले होते, मग तुम्ही 2014 ची निवडणूक का हारले; काँग्रेसच्या आरोपांवर PM मोदी संतापले

Pankaja Munde News | घोषणा देणाऱ्या आंदोलकांशी मुंडेंचा संवाद!

Today's Marathi News Live : गोरेगाव दिंडोशी विषबाधा प्रकरण,अनधिकृत खाद्य स्टॉलवर पालिकेकडून धडक कारवाई

Pune PM Narendra Modi Rally: ६० वर्षांत काँग्रेसला जे करता आलं नाही ते आम्ही केलं, PM मोदींचा पुण्यातून हल्लाबोल

Fact Check : उन्हाळ्यात वाहनात मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यास होऊ शकतो स्फोट? काय आहे सत्य? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT