Viral News Saam TV
देश विदेश

Viral News: अजब प्रथा! धार्मिक स्थळावर तरुणी 'ब्रा' काढून करतात पूजा; नेमकं कुठे आहे हे ठिकाण?

Ruchika Jadhav

Viral News: प्रत्येक धार्मिक स्थळांचे एक वेगळे महत्त्व आणि परंपरा आहे. तेथील देवस्थानांनुसार व्यक्तींनी आपल्या रीती घडवून ठेवल्या आहेत. यातील अनेक पर्यटन स्थळे तेथे असलेल्या देवस्थानाने ओळखले जातात. याची खास बात म्हणजे तिथे असलेल्या चालीरीती. अनेक ठिकाणी अशा काही चालीरीती असतात ज्यांना पाहून सर्वच चकित होतात. सध्या सोशल मीडियावर असेच एक श्रद्धास्थान व्हायरल होतं आहे. (Latest Viral News)

कोणतीही महिला बाहेर कुठेही अंगावरील कपडे दान करत नाही. मात्र न्यूझीलंडमध्ये एक असे देवस्थान आहे. इथे सर्व महिला आपली ब्रा काढून प्रार्थना करतात. ब्रा काढून त्या तिथे असलेल्या एका कुंपणाला अडकावतात आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करतात. सध्या या ठिकाणचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. इथे असंख्य महिलांच्या ब्रा अडकवलेल्या दिसत आहेत.

सेंट्रल ओटागो कार्डोना म्हणून हे ठिकाण जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणी सुरुवातीला कोणत्या महिलेने ब्रा अडकवली असेल याचा विचार आता नेटकरी करत आहेत. येथील काही स्थानिक व्यक्तींचे असे म्हणणे आहे की, सुरुवातीला या ठिकाणी त्यांना ४ ब्रा दिसल्या होत्या. त्यानंतर येथील व्यक्ती थोडे भयभीत झाले. मात्र नंतर या ठिकाणी ब्रा अर्पण करण्याची एक परंपरा झाली. या ठिकाणी पर्यटनासाठी आलेली प्रत्येक महिला 'कार्डोना ब्रा' येथे आवश्य भेट देतात.

साल २०१५ मध्ये महिलांमध्ये स्थनांच्या कर्करोगाचे (cancer) प्रमाण जास्त वाढले होते. त्यावेळी या ठिकाणाला 'ब्रॅड्रोना' असे नाव पडले. आता इथे येणाऱ्या महिला भाविकांमुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी जमा झालेली दिसते. सध्या या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि प्रत्येक साईजच्या ब्रा उपलब्ध झाल्या आहेत.

अशात काही दिवसांपूर्वी एका चोरट्याची नजर या ब्रावर पडली. मग त्याने रातोरात अनेक ब्रा चोरी केल्या. या ब्रा चोरी करून बाहेर विकत होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या चोरामुळे येथील ब्रॅड्रोनाच्या प्रसिद्धीत आणखीन भर पडली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT