VIRAL VIDEO: सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे जिथे एका रात्रीत व्यक्तीला मोठी पसंती मिळते. यावर अनेक प्राण्यांचे मनोरंजन करणारे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. अशता सोशल मीडियावर चार बोकड चांगलेच चर्चेत आले आहेत. याचं कारण म्हणजे हे काही साधेसुधे बकरे नसून दूध देणारे बोकड आहेत. या चारही बोकडांना पाहण्यासाठी गावात एकच गर्दी जमा होत आहे. (Latest Marathi News)
सदर व्हिडिओ मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील तुषार निमाडे यांच्या सरताज गोट फार्ममधून समोर आला आहे. बोकडांना पाहण्यासाठी गावातील तसेच शेजारच्या गावांमधील व्यक्ती देखील गर्दी करत आहेत. या ४ बोकडांनी दूध देण्याच्या क्षमतेने सर्वांनाच थक्क केलं आहे. सोशल मीडियावर सध्या त्यांची तुफान चर्चा होत आहे.
दररोज २५० ते ३०० मिली दूध
मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) तुषार यांनी त्यांच्या गोट फार्मवर वेगवेगळ्या जातीच्या ४ शेळ्या आणल्या आहेत. मात्र त्या बोकडा प्रमाणे दिसतात. तसेच हे बोकड दूध देखील देतात. तुषार यांनी या विषयी माहिती देत सांगितले आहे की, हे चारही बोकड असून मी ते वेगवेगळ्या ठिकाणांहून खरेदी केले आहेत. हे चारही दूध देतात. यातील पहिलं बोकड पंजाबच्या बिटल प्रजातीचे आहे. तर दुसरे बोकड भिंड मुरैना येथील हंसा बोकड आहे. तिसरे बोकड हैदराबादी बोकड आणि चौथे अहमदाबाद येथील पाथीरा बोकड आहे. हे चारही बोकड दररोज २५० ते ३०० मिली दूध देत असल्याचे गोट फार्म मालक तुषार यांनी सांगितले आहे.
एक बोकड लाखोंच्या किंमतीचे
या प्रत्येक बोकडाच्या (Goat) वेगवेगळ्या किंमती आहेत. बीटल प्रजातीच्या पहिल्या बोकडाचे नाव बादशाह असे ठेवले आहे. त्याची किंमत २ लाख १० हजार रुपये इतके आहे. तर दुसऱ्या हंसा जातीच्या बोकडाचं नाव सुलतान आहे. तसेच ३ लाख ५० हजार रुपये इतकी त्याची किंमत आहे. हैदराबाद येथून आणलेल्या बोकडाचं नाव हैदराबादी चाचा असं ठेवलं आहे. त्याची किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे. शेवटच्या पाथिरा जातीच्या बोकडाचे नाव शेरू असून १ लाख ७५ हजार अशी त्याची किंमत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.