Imran Khan Net Worth Saam Tv
देश विदेश

Imran Khan Net Worth : 600 एकर जमीन, हेलिकॉप्टर; अमाप संपत्तीचे मालक आहेत इम्रान खान

Imran Khan Property in Pakistan : 600 एकर जमीन, हेलिकॉप्टर; अमाप संपत्तीचे मालक आहेत इम्रान खान

Satish Kengar

Imran Khan Net Worth : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर देशात प्रचंड निदर्शने सुरु आहेत. परिस्थिती पोलीस आणि सैन्याच्या नियंत्रणाबाहेर होत आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. यातच देशात पुन्हा एकदा सैन्याचं सरकार येऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यातच इम्रान खान यांच्या अटकेनंतर आता त्यांची पत्नी बुशरा यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांनाही अटक होऊ शकते. इम्रान खान यांच्या तीन पत्नी आणि दोन मुलं आहेत. राजकारणी, उद्योगपती आणि माजी क्रिकेटपटू सोबतच इम्रान खान हे अफाट संपत्तीचे (Imran Khan Net worth) मालक आहेत. १६ मार्च २०२३ पर्यंत त्यांची मालमत्ता सुमारे ४१० कोटी रुपये होती. (Latest Marathi News)

Imran Khan Net Worth : 410 कोटी रुपयांची संपत्ती

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक आहेत. 16 मार्चपर्यंत त्यांची एकूण संपत्ती सुमारे 50 मिलियन म्हणजेच 410 कोटी रुपये होती. काही रिपोर्ट्सनुसार, म्रान खान यांनी विविध व्यवसायांमध्ये मोठी रक्कम गुंतवल्याचा दावा केला जात आहे.

Imran Khan Net Worth : ६०० एकर शेती

खान यांच्याकडे २ लाख रुपये किमतीच्या ४ शेळ्या होत्या. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनकडून ही माहिती मिळाली आहे. इम्रान खान यांचा बनीगाला येथे व्हिला आहे. लाहोरच्या जमान पार्कमध्ये त्यांचे घर आहे. इम्रानकडे जवळपास ६०० एकर शेती आणि बिगरशेती जमीन आहे.

Imran Khan Net Worth : इम्रान यांच्याकडे हेलिकॉप्टरही आहे

वर्ष २०१८ मध्ये इम्रान पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या संपत्तीत ४ शेळ्यांची नोंद होती. एका रिपोर्ट्सनुसार, इम्रान यांच्या बँक खात्यांमध्ये ६ कोटींहून अधिक रुपये होते. तसेच पाकिस्तानी विदेशी चलन खात्यांमध्ये ३,२९,१९६ डॉलर आणि ५१८ पौंड होते. इम्रान खान यांची एक हवेलीही आहे, जी इस्लामाबादमध्ये १,८१,५०० स्क्वेअर यार्डमध्ये पसरलेली आहे. इम्रान खान यांच्या नावावर कोणत्याही वाहनाची नोंदणी नाही. मात्र त्यांच्याकडेहेलिकॉप्टर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT