Weather Forecast Today 2 February 2024  Saam TV
देश विदेश

Weather Forecast: सावधान! येत्या २४ तासांत गारपीटीचा तडाखा बसणार; कोणकोणत्या भागांना झोडपणार? वाचा वेदर रिपोर्ट

Weather Update Today: राजधानी दिल्ली, पंजाब, हरियाणासह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये गुरुवारी (१ फेब्रुवारी) मुसळधार पाऊस झाला.

Satish Daud

Weather Forecast Today 2 February 2024

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. राजधानी दिल्ली, पंजाब, हरियाणासह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये गुरुवारी (१ फेब्रुवारी) मुसळधार पाऊस झाला. तर काही ठिकाणी जोरदार गारपीट देखील झाली. पावसामुळे हवेतील गारवा वाढल्याने थंडीची तीव्रता देखील वाढली. या अवकाळी पावसात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंजाब आणि हरियाणामध्ये काढणीला आलेला गहू गारपीटीमुळे पूर्णत: आडवा झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत अवकाळी पावसाचा जोर आणखीच वाढणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे. (Latest Marathi News)

आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत दिल्लीसह एनसीआर, उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस (Heavy Rain) होऊ शकतो. त्याचबरोबर पंजाब आणि हरिणायामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होऊ शकते. याशिवाय जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसासोबत बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दिल्लीत २७ मिमी पावसाची नोंद

दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. आयएमडीच्या माहितीनुसार, बुधवार आणि गुरुवारी दिल्ली २७.१ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे दिल्लीतील प्रदूषणात घट झाली आहे. हवामान खात्याने दिल्लीत आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांचा संपर्क तुटला

जम्मू काश्मीरमध्ये सलग दोन दिवसांपासून हिमवृष्टी सुरू आहे. गुरुवारी देखील श्रीनगर, कटरा, भैरो व्हॅलीसह जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात बर्फवृष्टी झाली. यामुळे रस्ते दिसेनासे झाले असून जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; २२ उपजिल्हाधिकाऱ्यांची बढती होणार

Akshay Kumar: डीपफेक व्हिडीओ प्रकरणात अक्षय कुमारला दिलासा; हायकोर्टाने दिले महत्वाचे आदेश

MNS Deepotsav : मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार शुभारंभ | VIDEO

Leopard: बिबट्यांची संख्या 1200 वर; राज्य सरकार बिबट्यांचा कसा बंदोबस्त करणार?

Silver Rate: दिवाळीच्या पहिल्या दिवशी चांदीच्या दरवाढीला ब्रेक; ४००० रुपयांची घसरण; वाचा आजचे भाव

SCROLL FOR NEXT