अफगाणिस्तानातून सैन्य परत बोलवण्याचा निर्णय योग्यच - राष्ट्रपती बायडेन  twitter/@POTUS
देश विदेश

अफगाणिस्तानातून सैन्य परत बोलवण्याचा निर्णय योग्यच - राष्ट्रपती बायडेन

अफगाणिस्तानमधील लोक त्यांच्या हक्कासाठी लढण्यास तयार नसताना आपण आपल्या सैन्याला त्या युद्धभूमीमध्ये का पाठवावे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य मागे हटवल्याने अफगाणिस्तान पुन्हा एकदा तालिबानच्या ताब्यात गेला आहे. यामुळे अमेरिकेवर टीका होत असताना राष्ट्रपती जो बायडेन यांनी आपल्या निर्णयाचं समर्थन केलंय. (I’m clear on my answer - President Biden)

हे देखील पहा -

गेल्या वीस वर्षांपासून अफगाणिस्तानात अमेरिकेचे सैन्य तैनात होते. त्यामुळे तालिबान अफगाणिस्तानच्या सत्तेपासून तालिबानला दुर ठेवण्यात अमेरिकेला आणि अफगानिस्तानातील अशरफ घानी सरकारला यश आले होते. मात्र काही महिन्यांपुर्वी अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपलं सैन्याला परत बोलवण्यास सुरवात केली आणि तालिबानने डोकं वर काढलं. अवघ्या १०३ दिवसांमध्ये तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतला. तालिबानमुळे अफगाणिस्तानचे नागरिक भयभित झाले आहेत. तालिबान्यांच्या अत्याचारामुळे अफगाणिस्तानात अराजकता माजली आहे.

अफगाणिस्तानला या परिस्थितीत सोडण्यासाठी अनेकजण अमेरिकेवर टीका करतायत. मात्र अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलंय. व्हाईट हाऊसमधून देशाला संबोधत असताना ते म्हणाले की, ''अमेरिकेतील आणखीन किती पिढ्या आपण अफगाणिस्तानमधील युद्धामध्ये लढण्यासाठी पाठवणार आहोत?

अफगाणिस्तानमधील लोक त्यांच्या हक्कासाठी लढण्यास तयार नसताना आपण आपल्या सैन्याला त्या युद्धभूमीमध्ये का पाठवावे? असे प्रश्न उपस्थित करत आधी केलेली चूक आपण करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आपण आपल्या निर्णयावर ठाम असून तोच अमेरिकेच्या दृष्टीने हिताचा असल्याचं बायडेन यांनी म्हटलंय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Special : श्रावणात चिकन-मटणाची चव येतेय? मग ही डुबुक वडी रेसिपी एकदा बनवाच

तेजस्विनी पंडितने आईला दिला मुखाग्नी, अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर; राज ठाकरेंची उपस्थित! VIDEO

Narendra Modi : डोक्यावर संविधान ठेवून नाचणारे राजकारणी आधी पायदळी तुडवायचे; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

Viral Video: जुगाड असावा तर असा! महिलेने तुटलेल्या कॅसरोल बॉक्सचा केला अनोखा वापर, व्हिडीओ पाहून विश्वास बसणार नाही

Election Commission: पुरावे मागितले तर उत्तर आलं नाही; राहुल गांधींकडून संविधानाचा अपमान: निवडणूक आयोग

SCROLL FOR NEXT