UPSC Success Story Saam Tv
देश विदेश

UPSC Success Story : वाह रे पठ्ठ्या! २ वेळा JEE पास करून IIT सोडलं; UPSC उत्तीर्ण होऊन IAS पदाचा राजीनामा, कोण आहे 'हा' जिगरबाज तरूण?

Rohini Gudaghe

मुंबई : सरकारी नोकरी तेही नागरी सेवेतील नोकरी मिळणं अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी कठोर मेहनत देखील करतात. तर BITS पिलानीसारख्या कॉलेजमध्ये शिकण्यासाठी विद्यार्थी जीव पणाला लावतात. परंतु गौरव कौशल नावाच्या तरूणानं दोन वेळा जेईई परीक्षा उत्तीर्ण करून देखील BITS पिलानीसारख्या संस्थेला सोडलं. इतकंच नव्हे गौरवने UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 38 वा क्रमांक मिळवून नागरी सेवेत नोकरी मिळवली, परंतु ती नोकरी देखील सोडली.

स्वतःला शोधण्यात आणि स्वप्नांच्या दिशेने पुढे जाण्यासाठी गौरवने अनेक संधी सोडल्या. आजकाल आपण अनेकदा पदवी आणि नोकऱ्यांवरून लोकांच्या यशाचे मूल्यांकन करतो. पण गौरवची कथा या विचारसरणीला आव्हान (Who Is Gaurav Kaushal) देणारी आहे. IIT मधून बाहेर पडलेल्या आणि BITS पिलानीला सोडून नंतर UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत ३८वा क्रमांक मिळवलेल्या गौरवने आयुष्यात अनेक विचित्र निर्णय घेतले होते. ते त्याने आपल्या मेहनतीने योग्य देखील सिद्ध केलेत.

गौरव हा हरियाणातील पंचकुला शहरातील रहिवाशी आहे. तो अभ्यासात नेहमीच उत्सुक असायचा. गौरवने आयआयटी-जेईई परीक्षा पास केली होती. आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश घेतला. पण अभियांत्रिकीचं शिक्षण त्याच्यासाठी नाही, हे त्याला लवकरच (UPSC Success Story) समजलं. त्यानंतर त्याने आयआयटी सोडली आणि बीआयटीएस पिलानी या प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.टेक इन कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घेतला. पण तिथेही गौरवचे मन रमेना. शेवटी त्याने पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून पदवी पूर्ण केली.

गौरवला नेहमीच आव्हानं स्वीकारायला आवडत होती. म्हणून त्याने यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. २०१२ मध्ये गौरवने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. भारतीय संरक्षण सेवा (IDES) मध्ये नोकरी सुरू (Success Story In Marathi) केली. गौरववर नागरी सेवेतील नोकरीत देशभरातील लष्कराच्या जमिनीची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. १२ वर्षे प्रामाणिकपणे काम करूनही गौरवला पुन्हा काहीतरी अपूर्ण असल्याचं जाणवलं. तेव्हा सर्वात मोठा निर्णय घेत गौरवने आयएएसची नोकरी देखील सोडली.

गौरव कौशलचे उद्दिष्ट आता येणाऱ्या पिढीतील यूपीएससी उमेदवारांना (UPSC Exam) मार्गदर्शन करणं होतं. आज गौरव यशस्वी मार्गदर्शन कार्यक्रम चालवतो. UPSC परीक्षेच्या तयारीसाठी वैयक्तिक मार्गदर्शन करण्यासाठी YouTube चॅनेल आणि ॲपद्वारे गौरव हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं काम करतो. गौरव कौशलची कहाणी समाजाच्या तथाकथित नियमांनुसार राहून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात खरं यश नाही, तर स्वतःची निवड आणि आनंद शोधण्यात आहे असं सिद्ध करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT