Government announces a major administrative reshuffle, transferring 20 IAS officers through a late-night order. saam tv
देश विदेश

राज्यातील २० IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, सरकारचा मध्यरात्री आदेश जारी

IAS Officers Transferred : राज्य सरकारने सचिव आणि मुख्य विकास अधिकाऱ्यांसह २० आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. कोणाच्या बदल्या झाल्या ते जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला.

  • सचिव आणि विशेष सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांचाही फेरबदल करण्यात आला.

  • पीसीएसमधून आयएएस बनलेल्या काही अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या.

उत्तर प्रदेशमध्ये गुरुवारी रात्री सरकारनं आदेश जारी करत प्रशासनात मोठा फेरबदल केला. योगी सरकारनं सचिव आणि विशेष सचिवांसह २० आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. यात तीन जिल्ह्यातील म्हणजेच आझमगढ, बलिया, आणि इटावाचे मुख्य विकास अधिकाऱ्यांची देखील बदली करण्यात आली आहे. यासह पीसीएसमधून आयएएस बनलेल्या काही अधिकाऱ्यांना नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

सुधा वर्मा यांची महसूल विभागाच्या सचिवपदावरून कामगार आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. मार्तंड शाही यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त होते. डॉ. सारिका मोहन यांची वैद्यकीय शिक्षण विभागाच्या महासंचालक आणि सचिव या पदांवरून नोंदणी महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. नेहा शर्मा यांची 'महानिरीक्षक या पदावरून 'वैद्यकीय शिक्षण विभागाच्या महासंचालक आणि सचिव' या पदावर नियुक्ती झाली आहे. तर अरुण कुमार यांची 'अतिरिक्त महासंचालक (भूविज्ञान आणि खनिकर्म)' या पदावरून 'मिशन'मध्ये बदली करण्यात आली आहे.

या प्रशासनातील या अदलाबदली दरम्यान जे. रीभा विशेष सचिव, भूविज्ञान आणि खनिकर्म यांच्याकडे त्यांच्या सध्याच्या जबाबदारीसोबतच 'अतिरिक्त संचालक' पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय. दीपा रंजन यांची 'मिशन संचालक (राज्य उपजीविका अभियान)' या पदावरून 'विशेष सचिव (संस्कृती विभाग)' या पदावर बदली करण्यात आलीय. संजय कुमार-१ (सध्याचे विशेष सचिव - संस्कृती आणि संचालक - धार्मिक कार्ये) यांना 'विशेष सचिव (संस्कृती)' या पदाच्या जबाबदारीतून मुक्त करून त्यांच्याकडे 'संचालक (संस्कृती)' या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय.

विशाल सिंह यांना 'विशेष सचिव (संस्कृती)' आणि 'संचालक (संस्कृती)' या पदांवरील जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्यात आले आहे. ते 'विशेष सचिव (संस्कृती)', 'संचालक (माहिती)' आणि 'संचालक (संस्कृती)' या पदांवर कार्यरत होते. संदीप भागिया यांची 'मध्यांचल विद्युत वितरण निगम'चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. आधी त्यांनी गौतम बुद्ध नगर आणि गाझियाबाद-II या दोन्ही ठिकाणी अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यभार संभाळला आहे. त्यांच्या मागील कार्यकाळादरम्यान त्यांच्याभोवती बरीच वादंगं निर्माण झाली होती.

परिक्षेत्र खटाना मुख्य विकास अधिकारी आझमगढमधील अप्पर आयुक्त गौतमबुद्ध नगर, राकेश कुमार पटेल अप्पर आयुक्त लखनौ मंडळाहून मुख्य विकास अधिकारी आझमगढ, महिला व बाल विकास विभाग (पोषण) आणि राज्य महिला आयोग या पदांवर कार्यरत असलेल्या रेणू तिवारी यांना बाल विकास व पोषण विभागातील विशेष सचिव या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol News: इथेनॉल मिक्स करूनही E20 हे E10 आणि शुद्ध पेट्रोलपेक्षा स्वस्त का नाही? सरकारने दिलं स्पष्टीकरण

राज्यात खळबळ! सत्ताधारी आमदाराच्या भावाने तरुणाला भररस्त्यात झोडपले; घटना CCTV मध्ये कैद

डायबिटीजच्या रुग्णांनी दुधात 'हा' पदार्थ मिसळून प्या, रक्तातील साखर वाढणार नाही

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर गळती

भाजप नेत्याकडून सासऱ्यांची चाकूने सपासप वार करून हत्या; पत्नीने माहेरी जाण्यास नकार दिल्याने उचलले भयानक पाऊल

SCROLL FOR NEXT