IAF Aircraft Crash Update: 2 Air Force planes crashed, one pilot seriously injured
IAF Aircraft Crash Update: 2 Air Force planes crashed, one pilot seriously injured SAAM TV
देश विदेश

IAF Aircraft Crash Update: हवाई दलाचे तीन नाही तर २ विमान दुर्घटनाग्रस्त, एक पायलट गंभीर जखमी

Chandrakant Jagtap

IAF Aircraft Crash Upadte: शनिवारी सकाळी भारतीय हवाई दलाची मध्यप्रदेशात दोन आणि राजस्थानमध्ये एक विमान कोसळ्याची बातमी समोर आली होती. परंतु हवाई दलाचे दोनच लढाऊ विमाने आज सकाळी प्रशिक्षणादरम्यान कोसळ्याचे हवाई दलाने स्पष्ट केले आहे. मध्यप्रदेशातील मोनेरा येथे सुखोई एसयू -30 आणि मिराज 2000 या विमानांचा अपघात होऊन ते कोसळ्याची घटना घडली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत दोन वैमानिक सुरक्षित असून एक गंभीर जखमी आहे.

मीडिया रिपोर्टनुसार सुखोईमध्ये दोन पायलट होते, तर मिराजमध्ये एक पायलट होता. ही दोन्ही विमाने भारतीय हवाई दलाच्या आघाडीवर वापरली जातात. सुखोईवरील दोन पायलट बाहेर पडण्यात यशस्वी झाले आणि त्यांना हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात नेण्यात आले. तर एक पायलट गंभीर जखणी असल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे.

या दोन्ही विमानांची हवेत टक्कर झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र त्याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या घटनेनंतर भारतीय हवाई दलाने ट्वीट करून अपघाताची माहिती दिली आहे.

"ग्वाल्हेरजवळ आज सकाळी भारतीय वायुसेनेच्या दोन लढाऊ विमानांचा अपघात झाला. हे विमान नियमित ऑपरेशनल फ्लाइंग ट्रेनिंग मिशनवर होते. यात सहभागी असलेल्या तीन वैमानिकांपैकी एकाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत" अशी माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Temperature : नांदेड जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद; पारा पोहचला ४३ अंशाच्या वर

Explainer : लोकल प्रवाशांची सहनशीलता संपलीय का? तुम्हाला काय वाटतं?

Today's Marathi News Live : मला मिळालेला प्रतिसाद १००१% निवडून येण्यासारखा; अर्चना पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

Yoga Tips: योगा करताना 'या' चुका टाळा अन्यथा होतील गंभीर परिणाम

Prasad Khandekar Birthday : 'पश्या खूप मोठा हो, यशाचे शिखरं गाठ...' नम्रता संभेरावने दिल्या प्रसाद खांडेकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT