Sidhu Moose Wala Saam Tv
देश विदेश

मोठी बातमी! सिद्धू मुसेवालाच्या हत्येत जवळच्या मित्रांचा हात? वडिलांनी केला दावा

सिद्धू मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंह यांनी मोठा दावा केला आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची २९ मे रोजी मानसा जिल्ह्यात गोळ्या घालून हत्या करण्यात झाली होती. त्यांचे खरे नाव शुभदीप सिंग सिद्धू होते. लॉरेन्स-बिश्नोई टोळीचा सदस्य असलेल्या कॅनडास्थित गोल्डी ब्रारने सिद्धूच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. सिद्धूची हत्या करणाऱ्या सहा शूटर्सपैकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे, तर एकजण अजुनही फरार आहे. आता यावर सिद्धू मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंह यांनी मोठा दावा केला आहे. 'मुलाचे अजूनही काही शत्रू आहेत, त्यांची नावे लवकरच उघड करणार असल्याचे म्हटले आहे.

'काही लोक माझ्या मुलाच्या करिअरचे शत्रू बनले होते. कारकिर्दीच्या सुरुवातीला तो ज्या लोकांना भेटला ते योग्य लोक नव्हते हे त्याचे दुर्दैव होते. त्याला हे कळत नव्हते की जे आपले भाऊ असल्याचा दावा करतात ते उद्या त्याचे शत्रू होतील. मी त्यांचे नाव घेईन. वेळ येऊ द्या काही दिवसांची गोष्ट आहे. कोणी काय केले हे मी सर्व काही स्पष्ट करणार आहे, असं बलकौर सिंह म्हणाले.

त्या जवळच्या लोकांनी मुलाच्या गाण्यांमधून शब्द काढून सरकार आणि गुंडांना भडकवण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्यात यश मिळू न शकल्याने मुसेवाला यांना मारण्याची योजना त्यांनी आखली, असंही बलकौर सिंह म्हणाले.

तरुण अकाली दलाचा नेता विकी मिद्दुखेडा यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सिद्धूची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. विकीच्या हत्येमध्ये सिद्धूचा (Sidhu Moose Wala) मॅनेजर असल्याचे सांगण्यात येत असलेल्या शगनप्रीतचे नाव समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणानंतर ठाण्यात सर्वपक्षीय नेते एकवटले

Banana : केळी खाल्ल्यानंतर किती लिटर पाणी प्यावे? ९०% टक्के लोक करतात ही चूक, आताच घ्या जाणून

Petrol Price Hike : मोठी बातमी! पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महागले; 'या' पंपांवर वाढले दर

राजकारणात खळबळ! माजी मुख्यमंत्र्यांना जोरदार झटका; माजी आमदारासह महत्वाच्या ३ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

चारित्र्याच्या संशयावरून नराधम पतीची पत्नीला बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, दोन मुलांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं

SCROLL FOR NEXT