Hydrogen Train 
देश विदेश

Hydrogen Train: देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची ट्रायल सुरू; 'या' मार्गावर धावणार पर्यावरण पुरक रेल्वे

Hydrogen Train: वंदे भारतनंतर हायड्रोन ट्रेन हा प्रकल्प भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारत हा हायड्रोजन ट्रेन चालवणारा भारत ५ वा देश ठरणार आहे.

Bharat Jadhav

भारतात आता हायड्रोजनवर चालणारी रेल्वे धावणार आहे. देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची चाचणी सुरू करण्यात आलीय. पर्यावरणाला अनुकुल असलेली ही ट्रेन जिंद ते सोनीपत या मार्गावर धावेल. जिंद ते सोनीपत हा ८९ किमीचा मार्ग आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी येथे ट्रेनची निर्मिती करण्यात आलीय. ही ट्रेन ११० किमी प्रति तासाच्या वेगाने धावू शकते. एकाच वेळी ही ट्रेन २६३८ प्रवाशांना नेऊ शकते. या ट्रेनची ताकद १२०० एचपी एवढी असणार आहे.

हायड्रोजनवर धावणाऱ्या ३५ ट्रेन बनविण्यात येणार आहेत. या ट्रेन ज्या देशातील विविध भागात धावणार आहेत. या ट्रेनमध्ये ८ कोच असतील. ही ट्रेन जगातील सर्वात जास्त लांबीची हायड्रोजन ट्रेन असेल. आतापर्यंत जगातील फक्त चार देशांमध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन आहेत. आता भारतातही या ट्रेन धावणार असल्यानं भारत हा पाचवा देश असणार आहे.

या ट्रेन ५०० ते ६०० एचपी ताकद निर्माण करतात. पण भारतात धावणारी हायड्रोजनवरील ट्रेन अधिक ताकदवान असेल. भारतामध्ये तयार होणाऱ्या हायड्रोजन ट्रेनचे इंजिन १,२०० एचपीचे असेल. हे जगातील सर्वात जास्त क्षमतेचे हायड्रोजन इंजिन असेन. हायड्रोजन ट्रेनमध्ये हायड्रोजन इंधन सेल असतो, जो हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या अभिक्रियेतून वीज निर्माण करत असतो. या प्रक्रियेत पाणी (H₂O) आणि ऊर्जा निर्माण होते. यामुळे ही ट्रेन पर्यावरणासाठी पुरक ठरणार आहे. प्रदूषणमुक्त ट्रेन असणार आहे.

या ट्रेनमधून कार्बन उत्सर्जन होणार नाही. हायड्रोजन हा एक स्वच्छ आणि पुनर्वापरित ऊर्जा स्रोत आहे. डिझेल आणि इलेक्ट्रिक ट्रेनपेक्षा ही ट्रेन अधिक फायदेशीर ठरेल. यंदाच्या अर्थसंकल्पात हायड्रोजन ट्रेनच्या निर्मितीसाठी २८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. या पायाभूत सेवांसाठी ६०० कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Payal Gaming Private Video: 25 वर्षीय युट्यूबरचा 1.20 मिनिटांचा MMS व्हिडिओ व्हायरल? सोशल मीडियावर उडाली खळबळ

Konkan Tourism : माझं कोकण भारी! थंडीत 'या' ठिकाणी पिकनिक प्लान करा

Red Flag Boys: तुमच्या बॉयफ्रेंडच्याही अशा सवयी असतील तर वेळीचं व्हा सावध, नाहीतर आयुष्यभर रडालं

Maharashtra Live News Update: रायगडच्या श्रीवर्धनमध्ये पुण्यातील पर्यटकांच्या थार जीपने एकाला चिरडलं

Thursday Horoscope: मनोबल वाढेल, ४ राशींना नोकरीत यश मिळेल, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT