Hyderabad News Saam Tv
देश विदेश

Hyderabad News: लग्नासाठीची सर्जरी पडली महागात, बोहल्यावर चढण्याअगोदरच नवरदेवाचा मृत्यू

Youth Dies During Dental Surgery: आपल्या लग्नात आपण सुंदर दिसावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. सर्वजण त्यासाठी प्रयत्न करतात, अशाच प्रयत्नात एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना हैद्राबादमध्ये घडली आहे.

Rohini Gudaghe

Groom Dies During Smile Sesigning Surgery

हैदराबादच्या (Hyderabad) एफएमएस इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकमध्ये दातांच्या प्रक्रियेदरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 28 वर्षीय उद्योगपती लक्ष्मी नारायण विंजम यांनी लग्नाआधी स्मितहास्य वाढवण्यासाठी दातांची सर्जरी बुक केली होती. (Latest Crime News)

आपल्या लग्नाच्या तयारीत असलेल्या एका 28 वर्षीय व्यावसायिकाचा डेंटल क्लिनिकमध्ये (Dental Clinic) अ‍ॅनेस्थेसियाचा ओव्हरडोज घेतल्याने मृत्यू झाला. ही घटना 16 फेब्रुवारी रोजी घटना घडली आहे. लक्ष्मी नारायण लग्नापूर्वी दातांच्या सर्जरीसाठी क्लिनिकमध्ये गेले होते. परंतु सर्जरीदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दातांच्या सर्जरीदरम्यान मृत्यू

16 फेब्रुवारी रोजी लक्ष्मी नारायण 'स्माईल डिझायनिंग' प्रक्रियेसाठी (Smile Sesigning Surgery) ज्युबली हिल्सच्या रोड क्रमांक 37 येथील एफएमएस इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकमध्ये एकटेच गेले होते. संध्याकाळी जेव्हा त्याचे वडील विंजाम रामुलू यांना फोन केला, तेव्हा क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी उत्तर दिलं की, त्यांचा मुलगा सर्जरी प्रक्रियेदरम्यान बेशुद्ध झाला होता.

त्यांनी लक्ष्मी नारायण यांना जवळच्या रुग्णालयात नेल्याचं सांगितलं. तेथे पोहोचल्यावर लक्ष्मी नारायणला मृत घोषित करण्यात आलं, अशी माहिती लक्ष्मी नारायणच्या कुटुंबियांनी आज तकला दिली (Hyderabad News) आहे.

अ‍ॅनेस्थेसियाच्या ओव्हरडोजमुळे मृत्यू झाल्याचा संशय

जुबली हिल्स पोलिसांकडे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी तक्रार नोंदवली आहे. त्याच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, 16 फेब्रुवारी रोजी प्रक्रियेदरम्यान त्यांना भूल दिल्यानंतर ते बेशुद्ध झाले. अ‍ॅनेस्थेसियाच्या ओव्हरडोज त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलेला (Youth Dies During Dental Surgery) आहे.

मृत लक्ष्मी नारायण विंजम यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून ज्युबली हिल्स पोलिसांनी एफएमएस इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकविरुद्ध आयपीसी कलम ३०४ ए (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT