Fight For Biryani Saam TV
देश विदेश

Fight For Biryani: गरमागरम मटण बिर्याणी न मिळाल्याने हॉटेलमध्ये जोरदार राडा; फ्री स्टाईल हाणामारीचा VIDEO व्हायरल

Fight For Undercooked Biryani: ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी एका कुटुंबाने बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा प्लान केला होता आपल्या प्लानप्रमाणे ते एका हैदराबादच्या एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आले.

Ruchika Jadhav

Hyderabad News:

नव वर्षाच्या स्वागतानंतर सध्या सोशल मीडियावर सुंदर आणि जंगी सेलिब्रशनचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये काही हस्यास्पद आणि काही संतापजनक व्हिडीओ देखील समोर आलेत. अशात हैदराबाद येथून एक संतापजनक घटना समोर आलीये. गरमागरम बिर्याणीसाठी येथे हॉटेलकर्मचारी आणि एका कुटुंबात हाणामारी झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी एका कुटुंबाने बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा प्लान केला होता आपल्या प्लानप्रमाणे ते हैदराबादच्या एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आले. यावेळी त्यांनी मटण बिर्याणी ऑर्डर केली. मात्र त्यांना देण्यात आलेल्या बिर्याणीबाबत त्यांनी हॉटेलच्या वेटरकडे तक्रार केली. बिर्याणी चांगली नसल्याचं त्यांनी म्हटलं.

आम्हाला दिलेल्या मटण बिर्याणीतील मटण पूर्ण शिजलेलं नव्हतं. अर्धवट शिजलेलं मांस आम्हाला देण्यात आलं. तसेच बिर्याणी पूर्ण थंड पडली होती. त्यामुळे आम्ही ती खाल्ली नाही, अशी तक्रार कुटुंबातील सदस्यांनी केली आहे. बिर्याणी व्यवस्थीत नसल्याने हॉटेलमधून निघताना या कुटुंबाने बील पे करण्यास नकार दिला.

मात्र हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना पैसे भरण्याचा आग्रह केला. काही वेळाने त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद हळूहळू विकोपाला गेला. भडकलेल्या हॉटेल कर्मचाऱ्यांनी या कुटुंबातील व्यक्तींना काठीणे मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हॉटेलमधील अन्य व्यक्ती सर्व घटना पाहत होते. हॉटेलमध्ये झालेल्या राड्याचा व्हिडीओ एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tadgola Benefits: कडाक्याच्या उन्हात ताडगोळे खाल्याने कोणकोणते फायदे होतात, ही माहिती एकदा वाचाच

Maharashtra Live News Update : साताऱ्यात मुसळधार पावसासह गारांचा पाऊस; रानगेघर, करंदी परिसरात गहू-ज्वारीचे नुकसान

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT