Representational image of crime scene: Newlywed woman alleges gang rape by husband and his friends in Hyderabad. saam tv
देश विदेश

लग्नाच्या रात्री नवरदेवासह ५ मित्र खोलीत गेले; नवरीला दारु पाजली, ओलांडल्या सर्व मर्यादा; नेमकं काय घडलं?

Hyderabad Wedding Night Gang Rape Case Details: हैद्राबादमध्ये लग्नाच्या रात्री नवऱ्यासह पाच मित्रांनी नवरीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले असून आरोपी अद्याप फरार आहेत.

Omkar Sonawane

एका महिलेवर तिच्या पतीने आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या सामूहिक बलात्काराची घटना हैद्राबादमध्ये घडली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली असून तेलंगणाच्या पोलिस महासंचालकांना आयोगाच्या अध्यक्षांनी निर्देश दिले आहेत की या नराधमांवर कडक कारवाई करावी. तसेच 7 दिवसांच्या आत या प्रकरणाचा अहवाल द्यावा.

नेमके प्रकरण काय?

गेल्या आठवड्यात एका 22 वर्षीय महिलेने पोलिसांकडे तक्रार केली की, लग्नाच्या रात्री तिच्या नवऱ्याने आणि त्याच्या साथीदारांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेला आता एक वर्ष झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हे सर्व आरोपी फरार आहे. आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील एका 28 वर्षीय पुरुषासोबत तिचे प्रेमसंबंध होते आणि 28 जुलै 2025 रोजी त्यांचे लग्न झाले. त्याच रात्री तिच्या नवऱ्याने लग्नाच्या रात्री त्याच्या पाच मित्रांना बोलावले होते आणि ते सगळे दारू पिले आणि त्या महिलेला देखील दारू पाजली. त्यानंतर ती महिला बेशुद्ध झाली. याचा गैरफायदा घेत तिच्या नवऱ्यासह सर्व मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला.

सुरुवातीला त्या महिलेने कुकटपल्ली पोलीस ठाण्यात संपर्क साधला, परंतु गुन्हा कथितरित्या त्यांच्या कार्यक्षेत्रात घडल्यामुळे हे प्रकरण बेगमपेट पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. तक्रारदार महिला कुकटपल्ली येथे तिच्या विधवा आई आणि लहान बहिणीसोबत राहते. या प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली असून या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र हे सर्व आरोपी अजुनही फरार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain health tips: विसर पडणं आणि लक्ष न लागणं वाढलंय? मेंदूचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी करा हे उपाय

राज्यात शेतकरी एकरकमी कर्ज परतफेड योजना सुरू; काय आहेत योजनेचे नियम-अटी?

Crime: दीड वर्षे महिलेवर बलात्कार, ३ वेळा गर्भपात; प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाचं भयंकर कांड, पोलिसही चक्रावले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची अर्जप्रक्रिया पुन्हा सुरु होणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करणार : मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT