Couple
Couple  ssaam TV
देश विदेश

Viral News: सॉफ्टवेअर इंजिनीअर नवऱ्याची वाटणी; ३ दिवस पहिल्या बायकोकडे, ३ दिवस दुसऱ्या बायकोकडे राहणार, रविवारी सुट्टी

साम टिव्ही ब्युरो

Viral News : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये पती आणि दोन पत्नींमधील अनोखी वाटणी चर्चेत आहे. इंजिनीअर असलेला नवरा करारानुसार ३ दिवस पहिल्या पत्नीसोबत आणि ३ दिवस दुसऱ्या पत्नीसोबत राहणार आहे. तर रविवारी स्वत:च्या इच्छेनुसार कुठेही राहू शकतो. कोर्टाबाहेर पती-पत्नींमध्ये हा अनोखा करार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेरमधील या सॉफ्टवेअर इंजिनिअरचं एका तरुणीशी लग्न झालं होतं. हा तरुण हरियाणातील गुरुग्राम येथे एका कंपनीत नोकरी करत होता. लग्नानंतर पती-पत्नी जवळपास 2 वर्षे गुरुग्राममध्ये एकमेकांसोबत राहिले. दोघांना एक मुलगाही झाला. (Latest News Update)

यानंतर मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. दरम्यान पती आपली पत्नी आणि मुलाला ग्वाल्हेरला ठेऊन गुरुग्रामला गेला. त्यानंतर परिस्थिती सामान्य असतानाही तो पत्नी आणि मुलाला घेण्यासाठी आला नाही. वैतागलेली पत्नी ग्वाल्हेरहून गुरुग्रामला निघून आली. त्यावेळी तिला कळालं की, लॉकडाऊन दरम्यान तिच्या पतीने त्याच कंपनीत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यासोबत लग्न केले. त्याच्या दुसऱ्या पत्नीनेही एका मुलीला जन्म दिला.

संतापलेली ती महिला आपल्या माहेरी परतली आणि तिच्या कुटुंबियांच्या मदतीने तिने ग्वाल्हेर फॅमिली कोर्टात धाव घेतली. दरम्यान महिलेने कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक हरीश दिवाण यांची भेट घेतली. समुपदेशकाने समजूतदारपणा दाखवत अभियंता पत्नीला समजावून सांगितले की, हे प्रकरण न्यायालयात बराच काळ चालणार असून तिला तिच्या पतीकडून केवळ काही रुपये मेंटेनन्स म्हणून मिळतील. त्या पैशातून ती या काळात तिचा आणि मुलाचा खर्च भागवू शकणार नाही. सोबतच कोर्ट-कचेरीत त्याचे पैसेही संपतील.

कोर्टात केस दाखल करण्यापूर्वीच समुपदेशक हरीश दिवाण यांनी महिलेच्या पतीशी फोनवर बोलले. त्यांना पत्नीसह गुरुग्रामहून ग्वाल्हेरला बोलावण्यात आले. जिथे या इंजिनीअरने सांगितले की तो आता त्याच्या पहिल्या पत्नीसोबत राहू शकत नाही, कारण तिचा स्वभाव चांगला नाही. याच कारणामुळे त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. तो आपल्या दुसऱ्या पत्नीला सोडायला तयार नव्हता. प्रकरण न्यायालयात गेल्यास खूप त्रास सहन करावा लागेल, असे समुपदेशकाने इंजिनीअरला समजावून सांगितले.

हिंदू विवाह कायद्यानुसार पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरे लग्न करणे बेकायदेशीर आहे. याशिवाय पहिली पत्नी हुंड्यासाठी छळासह इतर प्रकरणांमध्येही गुन्हा दाखल करू शकते. यासोबतच कौटुंबिक न्यायालयातही देखभालीसाठी केस दाखल करता येते. एफआरआय नोंदवल्यास कंपनीही त्याला नोकरीवरुन काढून टाकेल. समुपदेशकाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनीअरने करारनामा मान्य केला.

या न्यायालयाबाहेरील कराराला दोन्ही पत्नींनी संमतीही दिली. या करारानुसार पती पहिल्या पत्नीसोबत आठवड्यातून ३ दिवस आणि दुसऱ्या पत्नीसोबत ३ दिवस राहतील. रविवारी तो त्याला वाट्टेल ते करेल. म्हणजे रविवारी तो या दोघींसोबतही वेळ घालवू शकतो. करारानुसार, इंजिनीअरने त्याच्या दोन्ही पत्नींना गुरुग्राममध्ये स्वतंत्र फ्लॅटही दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astrology: रस्त्यात सापडलेले पैसे उचलणं शुभ की अशुभ?

Today's Gold Silver Rate : सोन्याचे दर पुन्हा कडाडले, चांदीही महागली; मुंबई-पुण्यातील आजचा भाव काय?

Chandrahar Patil: वसंतदादांचे नातू भाजपची बी टीम; पाकीट घेऊन 'मविआ'समोर उभे.. चंद्रहार पाटलांचा विशाल पाटलांवर प्रहार!

Today's Marathi News Live : श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीसाठी हजारो कार्यकर्ते डोंबिवलीत दाखल

Police Constable Death: चोरट्यांचा पाठलाग जीवघेणा ठरला; पाठीत विषारी इंजेक्शन खुपसलं, पोलीस जीवानिशी गेला

SCROLL FOR NEXT