Crime Saam
देश विदेश

Shocking: मेहुणीसाठी दाजी झाला वेडापिसा, मित्राच्या मदतीने बायकोचा काढला काटा

Extramarital affair crime: मेहुणीसोबत लग्न करण्यासाठी नवऱ्याने बायकोचा काटा काढला. प्लान रचला आणि पत्नीची हत्या केली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. पण पोलीस तपासात प्रकरण उघडकीस आलं.

Bhagyashree Kamble

मेहुणीसोबतच्या विवाहबाह्य संबंध असल्यामुळे पतीने पत्नीची हत्या केली आहे. पत्नीचा काटा काढण्यासाठी त्याने एक प्लान रचला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, पतीनेच पत्नीचा काटा काढला असल्याचं समोर आलं. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी घटनेचा तपास करून पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.

नागेना पोलीस स्टेशन परिसरात अंकित कुमार आपली पत्नी किरणसोबत राहत होता. तो पत्नीच्या माहेरी किरणला आणण्यासाठी गेला होता. रचलेल्या कटाप्रमाणे त्याने पत्नीला सासरी नेण्यासाठी दुचाकी आणली. तेथून दोघेही निघाले. रस्त्यावर राजपुरा पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी थांबले.

मिळालेल्या माहितीनुसार, पती दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेला. तेव्हा त्याने पत्नीला रस्त्यावर फेरफटका मारायला सांगितले. यादरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने महिलेला धडक दिली. धडक दिल्यानंतर कारचालक कार घेऊन पसार झाला. जबर धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला.

अंकितने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि पत्नीचे अपघाती मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी तपास सुरूच ठेवला. सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांना अंकितवर संशय आला. त्यांनी अंकितला ताब्यात घेतलं.

अंकितला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. पोलीस तपासात अंकितनेच बायकोच्या हत्येचा कट रचला असल्याचं सिद्ध झालं. पोलीस चौकशीत अंकितने सांगितले की, लग्नाला ५ वर्ष झाले. तरीही पत्नी गरोदर राहत नव्हती. यादरम्यान, मेहुणीसोबत प्रेमसंबंध जुळले. त्याला मेहुणीसोबत लग्न करायचे होते. परंतु, मेहुणीने लग्न करण्यास नकार दिला होता. कारण तो विवाहित होता.

त्यानंतर अंकितने बायकोचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी त्याने मित्राची देखील मदत घेतली असल्याचं सांगितलं. कट उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी पती अंकित आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. असं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं

Maharashtra News Live Update: अजित दादांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक

राज्यातील 80 लाख महिला अपात्र! ₹1500 सरकारच्या डोळ्यात खुपताय का?

पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

Satbara Utara : कामाची बातमी! ५ मिनिटात घरबसल्या काढा सातबारा, फक्त ₹१५ होणार खर्च; पाहा 7/12 ऑनलाइन काढण्याची सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT