Uttar Pradesh Bride and Groom Died in Bed Marathi News  Saam TV
देश विदेश

Shocking News: हनिमुनच्या रात्री विपरीत घडलं, नवरा-नवरीचा बेडवरच गेला जीव; धक्कादायक कारण उघड

Bride and Groom Died: थाटामाटात लग्न लागलं. नवरा मुलगा नवरीला घरी घेऊन आला. घरात नववधूचं आगमन झाल्याने आनंदाचं वातावरण होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वधू-वर त्याच्या खोलीत गेले.

साम टिव्ही ब्युरो

Uttar Pradesh Bride and Groom Died: थाटामाटात लग्न लागलं. नवरा मुलगा नवरीला घरी घेऊन आला. घरात नववधूचं आगमन झाल्याने आनंदाचं वातावरण होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वधू-वर त्याच्या खोलीत गेले.

पण दुसऱ्या दिवशी बराच वेळ झाला तरी त्यांच्या खोलीतून कोणीही बाहेर आलं नाही. कडी वाजवूनही दोघांनीही दरवाजा काही उघडला नाही. त्यामुळे नवऱ्या मुलाच्या लहान भावाने खिडकीतून डोकावून बघितलं. (Latest Marathi News)

तेव्हा रुममधील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकरली. नवरा-नवरी हे त्यांच्या बेडवर अगदी निपचित अवस्थेत पडले होते. दोघांचाही मृत्यू झाला होता. हे दृश्य पाहून कुटुंबियांनी आक्रोश केला.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बहराइच शहरात ही दुर्देवी घटना घडली. येथे दोन कुटुंबातील लग्नाचा आनंद एका क्षणात शोकसागरात विरून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील एका २२ वर्षीय तरुणाचं २० वर्षीय तरुणीसोबत नुकतंच लग्न झालं होतं.

त्यामुळे दोन्ही घरात आनंदाचे वातावरण होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वधू-वर त्याच्या खोलीत गेले. पण दुसऱ्या दिवशी बराच वेळ झाला तरी त्यांच्या खोलीतून कोणीही बाहेर आलं नाही. कडी वाजवूनही दोघांनीही दरवाजा काही उघडला नाही.

त्यामुळे नवरदेवाच्या भावाने पटकन दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील इतर मंडळी पळतच रुममध्ये शिरले त्यांनी दोघांनाही उठविण्याचा प्रयत्न केला. परंतू नवरा आणि नवरी मुलगी काहीच प्रतिसाद देत नव्हती त्यांचे शरीर थंड पडले होते.

त्यामुळे लग्न घरात एकच हाहाकार झाला. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तसंच दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मृत्यूचं जे कारण समोर आलं त्याने सर्वांनाच धक्का बसला.

शवविच्छेदन अहवालानुसार, दोघांना एकाचवेळी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, जेव्हा ही गोष्ट समोर आली तेव्हा अनेक सवाल उपस्थित केले जाऊ लागले.

दोघांना एकाच वेळी हृदयविकाराचा झटका कसा काय आला? एवढ्या लहान वयात दोघांच्या बाबतीत असं कसं घडलं? असे सवाल आता विचारले जात आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT