US Iran Saam Tv
देश विदेश

Middle East Conflict : अमेरिका-इराण युद्धात, भारताचा मित्र झाला मालामाल, नेमकं काय झाला फायदा? वाचा

US Iran conflict impact : अमेरिका–इराण संघर्षामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या परिस्थितीत रशियाच्या तेल निर्यातीत वाढ होत असून भारतासह अनेक देश रशियन तेल खरेदीकडे वळत आहेत. या युद्धामुळे रशियाला नेमका कसा आर्थिक फायदा होत आहे, जाणून घ्या.

Suprim Maskar

how Russia benefits from US Iran conflict oil prices : महासत्ता पैसा कमावण्यासाठीच इतरांवर युद्ध लादतात, असं म्हटलं जातं. तेच आता अमेरिका-इराण युद्धातून समोर आलंय... मध्य पूर्वेत शस्त्र विकून अमेरिकेची नेहमीच चांदी होते. मात्र यावेळी अमेरिका-इराण युद्धात रशिया मालामाल झालाय..तो नेमका कसा? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

इराण आणि इस्रायलमधील युद्धानं संपूर्ण जगाची होरपळ झालीय. अशातच एकीकडे इराणवर हल्ले सुरू असताना, दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष पुतिन आता 'शांतीदूत' बनण्याच्या तयारीत आहेत.पुतिन आणि ट्रम्प यांच्याl य़ुद्धाबाबत दोनदा चर्चा झालीय. मात्र इराण आणि अमेरिका, इस्रायल युद्धाचा फाय़दा रशियाला कसा झालाय, पाहूयात.

युद्धामुळे आखाती देशात रशिया प्रभावशाली शक्ती म्हणून स्वत:ला प्रस्थापित करतोय..युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल सुमारे 120 डॉलर पर्यंत वाढलेत. ज्यामुळे ट्रम्प यांनी काही देशांवरील तेलाशी संबंधित निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे रशियाच्या तेल निर्यातीत वाढ झालीय. अमेरिकेनं भारतालाही 30 दिवसांसाठी रशियाकडून तेल घेण्याची परवानगी दिलीय...त्यामुळे भारतानं रशियाकडून 30 दशलक्ष बॅरल रशियन तेल खरेदी केलयं. तर चीन हा रशियन तेलाचा जगातील क्रमांक 1 चा ग्राहक आहे. त्याशिवाय रशियाच्या 'युराल्स' ग्रेड तेलासाठी तुर्की हा महत्त्वाचा ग्राहक आहे. तर युरोपीय महासंघात रशियन तेलावर बंदी असली तरी काही देश रशियाच्या तेलावर अवलंबून आहेत. त्यामुळे रशियाचा युद्धात आर्थिक फायदा होतोय..

खरतर अमेरिकेच्या दबावामुळे भारत रशियन तेलाची खरेदी कमी करत होता. मात्र आता मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे पुरवठा विस्कळीत झाल्यानं रशियाकडून भारतानं तेल खरेदी केलयं. याआधी रशियाकडून भारत किती तेल आयात करायचा पाहूयात...

खरंतर 2021 पर्यंत भारत रशियाकडून फक्त 1 ते दीड टक्केच तेलाची आयात करत होता. मात्र रशिया युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर अमेरिका आणि युरोपिय देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. त्यावेळी रशियाने भारताला तेल खरेदीत घसघशीत सूट दिली आणि भारतानं मोठ्या प्रमाणात रशियातून तेल खरेदी सुरु केली. 2025 मध्ये भारतानं एकूण तेल खरेदीच्या गरजेपैकी 35.8 टक्के तेल खरेदी एकट्या रशियाकडून केली..या खरेदीवर जानेवारी 2026 मध्ये 13 डॉलर प्रति बॅरल इतकी सूट दिली जात होती... मात्र अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला. याच दबावातून भारतानं रशियाकडून तेल खरेदी कमी केली. फेब्रुवारी 2026 मध्ये फक्त 19.3 टक्के इतकंच तेल रशियाकडून खरेदी केलं. मात्र आता हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे युद्ध इराणमध्ये सुरू असलं, तरी त्याचा फायदा रशियाला होताना दिसतोय. तर दुसरीकडे भारत इंधनाची तुट भरून काढण्यासाठी चपळाईने पावलं उचलतोय. त्यामुळे अमेरिकेनं दिलेल्या हिरव्या कंदीलामुळे आणि रशियाच्या पुरवठ्यामुळे भारतातील इंधन टंचाई दूर होईल का? हा खरा प्रश्न आहे. तर या बदलत्या जागतिक समीकरणात अमेरिकेला फटका आणि रशियाला अधिका फायदा होणार का ? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील रिंग रोड आणि महामार्गांना अजित पवारांचे नाव द्या,रोहित पवारांची मागणी

Success Story: कॅन्सर-पॅरेलिसिसला हरवले, ४ सर्जरीनंतरही हरला नाही, ३८व्या वर्षी UPSCत यश; संजय डहरिया यांचा प्रवास

Iran Israel Conflict : इराणच्या एका क्षेपणास्त्रात ८० बॉम्ब, इस्रायलवर मोठा प्रहार, क्लस्टर बॉम्ब नेमका काय आहे?

Zumba: वजन कमी करण्यासाठी झुंबा खरचं फायदेशीर आहे का?

SSC Exam : बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षा मिशनचा फज्जा, दहावीचा पेपर ३ दिवस आधीच फोडला

SCROLL FOR NEXT