Saudi Arabia Houthi missile attack mosque damaged saam tv
देश विदेश

500 जणांचा मृत्यू; मशिद उद्ध्वस्त, सैन्याचे हवाई दलही संपुष्टात! भीषण मिसाइल हल्ल्याने जगात खळबळ

Saudi Arabia Houthi Missile Attack Mosque Damaged: येमेनमधील हूती बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या जाझान भागात मिसाइल हल्ला केल्याची माहिती आहे. हल्ल्यात मशिदीसह अनेक इमारतींचे नुकसान झाले असून दोन जण जखमी झाले.

Omkar Sonawane

हूती बंडखोरांकडून सौदी अरेबियावर सातत्याने हल्ले सुरू आहेत. यावेळी हूती बंडखोरांनी डागलेल्या मिसाइलच्या हल्ल्यात चक्क एका मशिदीचे नुकसान झाले असून, परिसरातील अनेक इमारतींनाही फटका बसला आहे. हा हल्ला सौदी अरेबियाच्या जाझान प्रांतात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सौदी सिव्हिल डिफेन्सच्या माहितीनुसार, शनिवारी येमेनमधील हूती बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या दक्षिणेकडील जाझान भागात मिसाइल हल्ला केला. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून, एका मशिदीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच परिसरातील इतर काही इमारती आणि धार्मिक स्थळांनाही हानी पोहोचली आहे.

सिव्हिल डिफेन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, नागरिकांच्या वापरातील ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न हा आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचा उघड उल्लंघन आहे. हल्ल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीतील आवश्यक प्रक्रिया लागू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, इराणचा पाठिंबा असलेल्या हूती बंडखोरांनी दावा केला आहे की, त्यांनी सौदी अरेबियाच्या दक्षिणेकडील नजरान प्रांतातील शरूराह येथे असलेल्या सौदी लष्करी तळाला लक्ष्य केले. या हल्ल्यासाठी बॅलिस्टिक मिसाइल आणि ड्रोनचा वापर केल्याचा दावा हूती लष्करी प्रवक्ते याह्या सरी यांनी केला आहे.

याह्या सरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील पोस्टमध्ये म्हटले की, या हल्ल्यात शस्त्रसाठे तसेच कमांड आणि कंट्रोल सेंटरला लक्ष्य करण्यात आले. या ठिकाणांवरून येमेन आणि येमेनमधील नागरिकांविरोधात लष्करी कारवाया केल्या जात असल्याचा दावाही त्यांनी केला. हूती प्रवक्त्याने सौदी अरेबियाला इशारा देताना म्हटले की, जर सौदीकडून पुढील लष्करी कारवाई करण्यात आली, तर सौदीच्या हद्दीत आणखी मोठे आणि तीव्र हल्ले केले जातील. मात्र, या दाव्याच्या समर्थनार्थ हूतींकडून कोणताही ठोस पुरावा देण्यात आलेला नाही.

दरम्यान, सौदी सिव्हिल डिफेन्सने खमीस मुशैत परिसरातील नागरिकांना संभाव्य धोक्याबाबत सतर्क केले होते. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचे आणि धोका टळल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

येमेनमध्ये हूती बंडखोर आणि सरकारी सैन्यादरम्यान संघर्ष सुरूच आहे. हूती बंडखोरांनी येमेनच्या लाल समुद्र किनारपट्टीवरील मोठ्या भागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा करण्यात येत आहे. रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले मोचा बंदर शहरही त्यांच्या नियंत्रणात असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, येमेनच्या सरकारी सैन्याने अल-जौफ, मारिब आणि अल-बैदा या भागांमध्ये नवे मोर्चे उघडले आहेत. या संघर्षात 500 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, हजारो नागरिक विस्थापित झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईकरांना मोठा दिलासा! ७ तलावांमध्ये ९६.६१ टक्के पाणीसाठा, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: पाटोदा येथे मुंबई दौऱ्यातील पहिल्या मुक्कामाची जय्यत तयारी सुरू आहे

Patole Recipe : केळीच्या पानांत वाफवलेल्या गोड पातोळ्या; जाणून घ्या साधी सरळ रेसिपी

80s Style Shirt Designs: ८०s शर्ट डिझाइन्स पुन्हा ट्रेंडमध्ये! 'या' ७ रेट्रो स्टाइल्सने मिळवा हटके आणि स्टायलिश लूक

India Fort : तीन रहस्यमयी दरवाजे असलेला ऐतिहासिक किल्ला, प्रत्येक द्वारामागे दडलीय वेगळी गोष्ट

SCROLL FOR NEXT