Stray Dogs Saam
देश विदेश

Crime News: संतापजनक! भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार, ब्लेडनं गुप्तांगावरही कट

Shocking crime in Bengaluru: एका नराधमानं रस्त्यावरील भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. नंतर ब्लेडनं गुप्तांगावरही कट मारले. नराधमाचा शोध सुरू.

Bhagyashree Kamble

एक संतापजनक घटना बंगळुरूमधून समोर येत आहे. एका नराधमानं रस्त्यावरील भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी बंगळुरूच्या जयानगरमधील शालिनी मैदानाजवळ घडली आहे. नराधमानं कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर कुत्र्याच्या गुप्तांगावर ब्लेडनं कटही मारला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुत्र्यावर अत्याचार करणारा नराधम हा २३ वर्षांचा आहे. हा तरूण मुळचा बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीनं कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्यानं गुप्तांगावर ब्लेडनं कट मारला. यामुळे कुत्रा जोरजोरात रडू लागला. कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.

नराधम कुत्र्यासोबत अश्लील कृत्य करत असताना एका व्यक्तीनं पाहिलं. नराधमानं त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर तेथून पळ काढला. नराधमाकडून अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर प्राणीप्रेमींनी या संतापजनक घटनेविरोधात आवाज उठवला. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नराधमानं दारू आणि गांजाच्या नशेत भटक्या कुत्र्यासोबत लैंगिक अत्याचार केला होता. प्राणीप्रेमींमुळे कुत्र्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. डॉक्टरांकडून कुत्र्यावर प्राथमिक उपचार सुरू असून, या प्रकरणी जयनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : खोटं व्हायला शिका नाहीतर दुनिया देईल धोका, चाणक्यांनी सांगितली ५ गंभीर गुपितं

Face Care: रोजच्या प्रवासामुळे चेहरा पूर्ण डल झालाय? मग आठवड्यातून २ वेळा लावा ही घरी तयार केलेली पेस्ट

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरेंचा फुटलेल्या खासदारांच्या मतदार संघात दौरा

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

SCROLL FOR NEXT