Crime News  Saam Tv
देश विदेश

Crime News: आधी पतीला दोरीनं बाधलं, नंतर मुलाच्या गळ्यावर चाकू ठेवला; महिलेवर केला लैंगिक अत्याचार

Woman Assaulted at Knife Point Tamil Nadu Police Arrested accuse: २७ वर्षीय विवाहित महिलेवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केला आहे. या धक्कादायक प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Bhagyashree Kamble

एका २७ वर्षीय विवाहित महिलेवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. आरोपीने आधी पतीला बांधले, नंतर मुलाच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना तामिळनाडूतील तिरूपूर शहरात घडली आहे. या प्रकरणात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं घडलं काय?

तिरूपूर जिल्याचे पोलीस अधिक्षक यादव गिरीश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ओडिशाची रहिवासी आहे. महिला आणि कुटुंबातील सदस्य लोकल गारमेण्ट फॅक्टरीमध्ये काम करतात. कुटुंबातील सदस्या आपल्या कामापासून आनंदीत नव्हते. १७ फेब्रुवारीला कुटुंबाची भेट आरोपींसोबत झाली होती.

आरोपीं व्यक्तीेंनी पीडित महिलेच्या कुटुंबाला नोकरीचे आमिष दाखवून एका खोलीत बोलावून घेतलं. आरोपी व्यक्तींनी रात्री पतीला बांधून ठेवलं. नंतर चाकूचा धाक दाखवत महिलेवर लैंगिक अत्याचार केला. पीडित महिलेने जेव्हा आरडाओरडा करत विरोध केला. तेव्हा त्यांनी महिलेच्या मुलाच्या गळ्यावर चाकू ठेवत धमकावण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर मंगळवारी सकाळी पीडित महिला आणि तिच्या पतीने तिरूपूर महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तपास करत. २ आरोपी आणि एका १७ वर्षीय मुलाला अटक केली आहे. महिलेला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसराच एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT